agriculture news in marathi, In Nanded district, crops of 65,000 hectares have been affected due to heavy rain | Agrowon

नांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खरीप तसेच फळपिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहूर, किनवट, हिमायतनगर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नुकसानाची पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खरीप तसेच फळपिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहूर, किनवट, हिमायतनगर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नुकसानाची पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दोन दिवस अतिवृष्टी झाली. अनेक मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. शुक्रवारी (ता. १७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये वाई बाजार (ता. माहूर) मंडळामध्ये २३२ मिमी पाऊस झाला होता. मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, नद्यांना पूर आले. पुराचे पाणी शेतातील उभ्या पिकांमध्ये शिरले. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे जमिनी खरडल्या, मातीचा सुपीक थर वाहून गेला. कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके मुळ्या तुटल्याने पिके आडवी झाली.

माहूर तालुक्यातील ८३ गावांतील ३४ हजार ६४९ हेक्टवरील खरीप तसेच बागायती पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. त्यापैकी २८ हजार ३७४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. किनवट, हिमायतनगर, हदगांव तसेच अन्य काही तालुक्यांतील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण ६५ हजार हेक्टरवरील खरीप तसेच फळ पिकांचे अतिवृष्टी, पुरांमुळे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी तसेच महसूल विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन बाधित पिकांचे संयुक्त पंचनामे केल्यानंतरच प्रत्यक्ष नुकसान क्षेत्र स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायमनांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया...पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी...
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभवकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...