agriculture news in marathi, In Nanded district, green grams productivity 5 quintals of per hector | Agrowon

नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्टरी ५ क्विंटल
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४ क्विंटल ९५ किलो (एकरी १ क्विंटल ९८ किलो) आली आहे. तर उडदाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ५ क्विंटल ३० किलो (एकरी २ क्विंटल १२ किलो) आली आहे. कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कार्षावरून हे समोर आले आहे.

नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४ क्विंटल ९५ किलो (एकरी १ क्विंटल ९८ किलो) आली आहे. तर उडदाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ५ क्विंटल ३० किलो (एकरी २ क्विंटल १२ किलो) आली आहे. कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कार्षावरून हे समोर आले आहे.

यंदाच्या (२०१८-१९) च्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात मुगाची २६ हजार ४५१ हेक्टरवर पेरणी झाली होती. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मुगाचे एकूण १९२ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. सोळापैकी नांदेड आणि हदगांव तालुके वगळता अन्य १४ तालुक्यांतील १५० पीक कापणी प्रयोगाचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार प्रतिहेक्टरी सरासरी ४ क्विंटल ९५ किलो उत्पादकता आल्याचे आढळून आले.

तालुकानिहाय मुगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता क्विंटलमध्ये याप्रमाणे आहे. अर्धापूर तालुका (७.७६), मुदखेड तालुका (५.१८), कंधार तालुका  (५.५५), लोहा तालुका (५.७७), बिलोली तालुका (५.९६), देगलूर तालुका (४.६८), धर्माबाद तालुका (४.२४), नायगांव तालुका (७.१५), मुखेड तालुका (३.६६), माहूर तालुका (५.०७), हिमायतनगर तालुका (२.२६),  किनवट तालुका (४.२४), भोकर तालुका (३.७१), उमरी तालुका (३.६५) एवढी आली आहे.

नांदेड जिल्ह्याची मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४ क्विंटल आहे. यंदा १४ तालुक्यांची मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४ क्विंटल ९५ किलो म्हणजेच एकरी १ क्विंटल ९८ किलो एवढी आली आहे. मुखेड, भोकर, हिमायतनगर, उमरी तालुक्यात मुगाची उत्पादकता सरासरीपेक्षा कमी आली आहे.

यंदा नांदेडमध्ये उडदाची २९ हजार ५२० हेक्टरवर पेरणी झाली होती. कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे उडदाच्या ३४८ पीक कापणी प्रयोगाची नियोजन करण्यात आले होते. नांदेड आणि हदगांव तालुके वगळता उर्वरित १४ तालुक्यांतील २०० प्रयोग विश्लेषित करण्यात आले. त्यानुसार या तालुक्यातील उडदाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ५ क्विंटल ३० किलो म्हणजेच एकरी २ क्विंटल १२ किलो आली असल्याचे आढळून आले आहे.

जिल्ह्याची उडदाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४.१० क्विंटल आहे. यंदा देगलूर तालुक्यात उडदाची सरासरी उत्पादकता घटली आहे. यंदाची उडदाची तालुकानिहाय उत्पादकता क्विंटलमध्ये याप्रमाणे आहे. अर्धापूर तालुका (६.७९), मुदखेड (७.१६), कंधार (४.४८), लोहा (६.०५), बिलोली (५.१६), देगलूर (३.३३), धर्माबाद (४.४६), नायगांव (१०.४७),मुखेड (५.०), माहूर (५ .०९), हिमायतनगर (४.७७), किनवट (४.४६),भोकर (४.३७), उमरी (५.८५).

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...