agriculture news in marathi, Nanded district has distributed 8.29 percent of the crop | Agrowon

नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती अतिशय संथ आहे. आजवर दहा टक्केदेखील कर्जवाटप झालेले नाही. यंदा १ हजार ६८३ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. सोमवार (ता. १८) पर्यंत २५ हजार ३९४ शेतकऱ्यांना १३९ कोटी ६७ रुपये (८.२९ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले.
संथगतीने पीककर्ज वाटप करणाऱ्या तीन बॅंकांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचे सांगितले आहे.

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती अतिशय संथ आहे. आजवर दहा टक्केदेखील कर्जवाटप झालेले नाही. यंदा १ हजार ६८३ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. सोमवार (ता. १८) पर्यंत २५ हजार ३९४ शेतकऱ्यांना १३९ कोटी ६७ रुपये (८.२९ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले.
संथगतीने पीककर्ज वाटप करणाऱ्या तीन बॅंकांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचे सांगितले आहे.

जिल्ह्यातील बॅंकांना यंदाच्या खरीप हंगामात २ लाख १० हजार ४३४ शेतकऱ्यांना १ हजार ६८३ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना १ हजार २१५ कोटी १६ लाख रुपये, खासगी बॅंकांना ७८ कोटी ३२ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या २३७ कोटी १६ लाख रुपये, जिल्हा सहकारी बॅंकेच्या १५२ कोटी ८२ लाख रुपये पीककर्ज उद्दिष्टाचा समावेश आहे.
सोमवार (ता. १८) पर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ५ हजार ६३७ शेतकऱ्यांना ४८ कोटी ८२ लाख रुपये (४.०२ टक्के), खासगी बॅंकांनी ८९४ शेतकऱ्यांना २५ कोटी ५९ लाख रुपये (३२.१३ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ४ हजार ५०१ शेतकऱ्यांना ३२ कोटी ७२ लाख रुपये (१३.८० टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने १४ हजार ३६२ शेतकऱ्यांना ३२ कोटी ५४ लाख रुपये (२१.२९ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. सोमवार (ता. १८) पर्यंत बॅंक आॅफ बडोदा, ओरिएंटल बॅंक आॅफ काॅमर्स, युनियन बॅंक आॅफ इंडिया या बॅंकांनी कर्ज वाटप सुरू केलेले नव्हते.

जिल्ह्यातील १९ राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या कर्ज खातेदार शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५१ हजार ८९५ आहे. परंतु या बॅंकांची कर्जवाटपाची गती अत्यंत संथ असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरिपाची पेरणी सुरू झालेली आहे. परंतु वेळेवर पीककर्ज मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बी, बियाणे, खते खरेदीसाठी उधार उसनवारी करावी लागली, अनेकांना सावकारी कर्ज काढावे लागत आहे.

...तर बॅंकांवर कार्यवाही करणार
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा समन्वय समितीमार्फत वारंवार बैठक घेऊन पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेण्यात येतो. परंतु या बैठकांना इंडियन ओव्हरसीज बॅंक, ओरिएंटल काॅमर्स बॅंक, बॅंक आॅफ इंडिया या बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित राहत नाहीत. तसेच या बॅंकांकडून पीककर्ज वाटप संथ गतीने होत आहे. या बॅंकांच्या उदासीन धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असताना बॅंकेकडूनही तसा प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. वारंवार सूचना आणि आदेश देऊनही उद्दिष्टपूर्ती न करणे ही बाब भारतीय रिजर्व बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे विभागीय चौकशी तथा फौजदारी स्वरूपाची कार्यवाही का करण्यात येऊ नये, या बाबत दोन दिवसांत समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करावा. विहित मुदतीत खुलासा सादर न केल्या तर एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल, अशा नोटिसा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तीन बॅंकांना बजावल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...