agriculture news in marathi, nanded district in heavy rain | Agrowon

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश मंडळांमध्ये बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीपासून गुरुवार (ता. ७) सकाळी आठपर्यंत माॅन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, माहूर, हदगाव आदी तालुक्यांतील ९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश मंडळांमध्ये बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीपासून गुरुवार (ता. ७) सकाळी आठपर्यंत माॅन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, माहूर, हदगाव आदी तालुक्यांतील ९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला. मुसळधार पावसामुळे जमिनी खरडून गेल्या. लागवड केलेले हळद बेणे तसेच सोयाबीन बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (११४ मिमी), सरसम (९५ मिमी), जवळगाव (७० मिमी), वाई बाजार (११३ मिमी), सिंदखेड (७२ मिमी), तामसा (१३३ मिमी), आष्टी (९३ मिमी), बारुळ (६५ मिमी), किनी (७८ मिमी) सात मंडलामध्ये अतिवृष्टी झाली.

हिमायनगर, हदगाव, माहूर तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, कंधार, लोहा, किनवट, मुखेड, नायगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. धर्माबाद, बिलोली, देगलूर तालुक्यांत पावसाचा जोर कमी होता. गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत अनेक भागांत पाऊस सुरूच होता. मुसळधार पावसामुळे अनेक मंडळांतील शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी तयार केलेल्या जमिनी खरडून गेल्या. नुकतेच लागवड केलेले हळदीचे बेणे तसेच सोयाबीनचे बियाणे वाहून गेले. हिमायनगर येथे ३७ मेंढ्या दगावल्या. गंगाखेड, पालम, पूर्णा, परभणी, सेलू तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी) नांदेड जिल्हा ः नांदेड शहर २४, नांदेड ग्रामीण २०, वसरणी ३३, तरोडा २३, तुप्पा ३५, लिंबगाव ३३, विष्णुपुरी ३०, हिमायनगर ११४, सरसम ९५, जवळगाव ७०, किनवट ३०, इस्लामपूर १८, मांडवी २७, बोधडी ४८, दहेली ४७, जलधारा २३, शिवणी ३६, उमरी ३३, सिंधी ३६, येवती २४, बाऱ्हाळी २१, चांडोला २५, मुखेड ३९, जांब ३२, नायगाव ३०, मांजरम ५२, बरबडा ३२, माहूर ४५, वाई ११३, वानोळा ४०, सिंदखेड ७७, मुदखेड ५३, मुगट ४५, बारड ४१, हदगाव ६१, तामसा १३३, पिंपरखेड ५४, आष्टी ९३, तळणी ३६, मनाठा ४०, निवघा ५८, कंलबर ३२, कापशी ४०.
परभणी जिल्हा ःदैठणा १५, चाटोरी ४३, बनवस २७, पूर्णा १९, चुडावा १९, राणीसावरगांव १५, माखणी १५, मानवत १८. हिंगोली जिल्हा ः माळहिवरा ३०, बासंबा १८, कळमनुरी १५, नांदापूर २५, आखाडा बाळापूर १८, हट्टा १६, गिरवगांव १९, आंबा १५.

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...