नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन आरोग्यपत्रिकांचे होणार वाटप

नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन आरोग्यपत्रिकांचे होणार वाटप
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन आरोग्यपत्रिकांचे होणार वाटप

नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १६ गावांतील ८ हजार ६४० शेतकऱ्यांची निवड झाली. गावशिवारातील सर्व विहितीखालील क्षेत्राचे माती परीक्षण करून त्यांना ९ हजार ८७ जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात येतील, अशी माहिती मिळाली. 

या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील १ गाव, या प्रमाणे एकूण १६ गावांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या १६ गावांतील एकूण खातेदार शेतकऱ्यांची संख्या ८ हजार ६४० आहे. त्यांचे एकूण विहितीखालील क्षेत्र १० हजार ५६६ हेक्टर आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या गाव शिवारात विविध ठिकाणी विहितीखालील क्षेत्रातून माती नमुने काढण्यात येतील. माती परीक्षणानंतर निवड शेतकऱ्यांना एकूण ९ हजार ८७ जमीन आरोग्यपत्रिका देण्यात येतील. 

नांदेड, अर्धापूर, मुदखेड, लोहा, कंधार, मुखेड, हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी या १० तालुक्यांतील ५ हजार ८२२ शेतकऱ्यांच्या ७ हजार १३ हेक्टर विहितीखालील क्षेत्रातून ६ हजार ८९ मृदा नमुने काढण्यात येतील. या मृदा नमुन्यांचे परीक्षण नांदेड येथील जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेत केले जाईल.

देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, किनवट, माहूर या सहा तालुक्यांतील २ हजार ८१८ शेतकऱ्यांच्या ३ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावरून २ हजार ९९८ मृदा नमुने काढण्यात येतील. त्यांचे परीक्षण सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेत केले जाईल, असे जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृदा चाचणी प्रयोगशाळेतील सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय निवडलेल्या गावातील स्थिती

तालुका  गाव शेतकरी विहिती क्षेत्र मृदा नमुने 
नांदेड  किक्कर २८०  २४४ ३१०
अर्धापूर जांभरुन ३०९ ३३३  २८६
मुदखेड  शेंबोली ७००  ६४६ ६८०
लोहा खडकमांजरी ७४२ ६२५   ७४२
कंधार नवघरवाडी २७०  १६५   २७०
मुखेड हंगरगा  ४०५ ५४१ ५१०
हदगाव  बनचिंचोली ९१० १२०० ९१०
हिमायतनगर सरसम बु १४१७ २१६८ १४१७
भोकर भागापूर   ४२०  ६२५ ५९५
उमरी  नागठाणा ३६९ ४६६ ३६९
देगलूर   देगांव बु ६९५ ८८० ६९५
बिलोली सावळी ७८४   ९१४  ७८४
नायगाव श्रंचोली  ३४०  ५४७ ३४०
धर्माबाद  बाभळी  ४८४ ४६० ५३३
किनवट मानसिंग नाईकतांडा २५६ ३५१ २५६
माहूर मेट  २५९   ३९० -

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com