agriculture news in marathi, nanded districts two mandal in Heavy rain | Agrowon

नांदेड जिल्ह्यात दोन मंडळामध्ये अतिवृष्टी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मुगट (ता. मुदखेड) मंडळामध्ये (८५ मिमी) आणि मोघाळी (ता. भोकर) मंडळामध्ये (६५ मिमी) अतिवृष्टी झाली.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मुगट (ता. मुदखेड) मंडळामध्ये (८५ मिमी) आणि मोघाळी (ता. भोकर) मंडळामध्ये (६५ मिमी) अतिवृष्टी झाली.

जिल्ह्यातील दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यात पावसाचा जोर होता. नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळामध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. मुगट आणि मोघाळी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड, हिमायतनगर, लोहा, किनवट तालुक्यातील अनेक मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यातील मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील तीन आणि वसमत तालुक्यांतील दोन मंडळामध्ये पावसाचा जोर अधिक होता.

पूर्वमोसमी पाऊस दररोज हजेरी लावत असल्यामुळे शेततळे, नालाखोलीकरण, सलग खोल समतल चर यामध्ये पाणीसाठा जमा होत आहे. पूनर्भरण केलेल्या विहिरींच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. यामुळे पाणीटंचाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मंडळनिहाय पाऊस (मिमी मध्ये) नांदेड जिल्हा ः तुप्पा २०, कापशी ३६, भोकर ४०, मोघाळी ६५,  मुदखेड ४६, मुगट ८५, जवळगांव ४२, जलधारा ३५. परभणी जिल्हा पालम १६, पूर्णा १९, ताडकळस २२.५०, राणीसावगरगाव १०, हिंगोली जिल्हा कळमनुरी २४, नांदापूर ४३, वाकोडी १५, आंबा १२, हयातनगर १४.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...