agriculture news in marathi, in Nanded division 33 sugar factory ready season | Agrowon

नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या गाळपाचे नियोजन
माणिक रासवे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर कारखान्यांनी २०१७-१८ च्या गाळप हंगामात ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. या साखर कारखान्यांना १ लाख ३२ हजार हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर कारखान्यांनी २०१७-१८ च्या गाळप हंगामात ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. या साखर कारखान्यांना १ लाख ३२ हजार हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

यंदा उसाची उपलब्धता वाढल्यामुळे गाळपाचे नियोजन करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय अंतर्गत नांदेड विभागामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये एकूण ४६ साखर कारखाने आहेत. यावर्षी ३३ साखर कारखान्यांनी गाळपाचे नियोजन केले आहे. या साखर कारखान्यांना गाळपासाठी १ लाख ३२ हजार हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे.

२०१४ मध्ये अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे २०१५ च्या हंगामात नांदेड विभागातील २५ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती उद्भवली पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना ऊस मोडून टाकावा लागला. परिणामी २०१६ च्या गाळप हंगामात साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस कमी पडला होता.

गतवर्षी ४६ पैकी १८ साखर साखर कारखान्यांनी गाळपाचे नियोजन केले होते. परंतु, प्रत्यक्षात ११ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले. परंतु, गाळपासाठी ऊस कमी पडल्यामुळे सरासरी साडेचार ते पाच महिने चालणारे या साखर कारखान्यांचे गळित हंगाम अवघ्या तीन महिन्यांत आटोपले होते.
२०१६ मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी बेणे उपलब्ध करून दिले होते. अनेक शेतकऱ्यांनी इतर जिल्ह्यांतून ऊस बेणे विकत आणून लागवड केली होती. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामात साखर कारखान्यांना १ लाख ३२ हजार हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात २४ हजार हेक्टर, परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील ३,०८६ हेक्टर, जिंतूरमधील २२०, सेलू १,७०५, मानवत २,१४५, पाथरी ४,३३६, सोनपेठ ३,२४१, गंगाखेड ३,१६५, पालम ३६७, पूर्णा ६,७३५ हेक्टर एकूण २५ हजार हेक्टर वरील ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध होणार आहे.

या व्यतिरिक्त हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातून  ८३ हजार हेक्टरवरील ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली तसेच अन्य जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे बाॅयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रम झाले आहेत. ऊस उपलब्ध झाल्यामुळे यंदा गाळप करणाऱ्या कारखान्याची संख्या वाढली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीसोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून...
नांदेड: माहूर मंडळात मुसळधारमाहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून...
औरंगाबादेत श्रावणाची पहिली सरऔरंगाबाद : गेल्या वीस पंचवीस वडीवसंपासून पावसाने...
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर लातूर...लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या...
पोपट पाळल्यास तुरुंगवासमुंबई - घरात पोपट पाळण्याची हौस महागातही पडू...
मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना...औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील...
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे...मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७...
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...