जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
अकोला : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी पेरण्यांचे काम हाती घेतले. मात्र पावसात अाता जवळपास अाठ दिवसांचा खंड पडल्याने हे पेरणी करणारे शेतकरी चिंतातूर झाले अाहेत. हवामान विभागाच्या अंदाजाकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहे. वऱ्हाडात बहुतांश भागात अाठ दिवसांपेक्षा अधिक काळापासून पाऊस झालेला नाही. या पावसाअभावी उगवलेल्या पिकांना फटका बसण्याची चिन्हे अाहेत. शिवाय पेरण्यासुद्धा रखडल्या अाहेत.

या भागात मृग नक्षत्राला सुरवात झाल्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी पेरणीच्या; तसेच मशागतीच्या कामात व्यग्र झाले होते. परंतु अाता दहा दिवसांपासून बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली. पावसात खंड पडल्याने अद्याप ९५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरणी व्हायची अाहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांच्या शेतात पीक उगवले खरे; परंतु अाता दिवसभर तापणाऱ्या उन्हामुळे पिकांची स्थिती वाईट होत अाहे. जमिनीतील अोलावा दर दिवसाला कमी होत चालला अाहे.
अातापर्यंत सोयाबीन, मूग, उडीद अाणि कपाशी या पिकांची तीन ते चार टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. अाता पावसाअभावी गेल्या अाठवड्यापासून पेरणीचे काम शेतकऱ्यांनी थांबवले. पाऊस २२ जूननंतर येण्याचे अंदाज असल्याने पेरण्या जूनच्या शेवटच्या अाठवड्यात पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे.
पेरण्यांना उशीर झाल्यास पर्यायी पिकांची तयारीसुद्धा करावी लागणार अाहे. सध्या सर्वच शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली अाहे. पावसाअभावी कृषी निविष्ठा विक्री क्षेत्रात पुन्हा मरगळ अाली. गेल्या अाठवड्यात या केंद्रांवर दिसणारी ग्राहकांची गर्दी पुन्हा एकदा अोसरली अाहे. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र असते. त्यानंतर कपाशीचे क्षेत्र राहते. अाता पाऊस लांबत गेल्यास कपाशीच्या लागवडीलासुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली अाहे.
- 1 of 348
- ››