agriculture news in marathi, IN Nanded, Hingoli Moong, black gram buying start | Agrowon

नांदेड, हिंगोलीत मूग, उडीद खरेदीला सुरवात
माणिक रासवे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर शनिवार(ता.२८)पर्यंत १५० शेतकऱ्यांचा ७८० क्विंटल ५० किलो मूग आणि उडीद खरेदी करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात मात्र मूग, उडिदाची खरेदी झाली नाही. आर्द्रतचे प्रमाण १२ टक्के पेक्षा अधिक येत असल्यामुळे तीनही जिल्ह्यांमध्ये अद्याप सोयाबीनची खरेदी होऊ शकली नाही.

दरम्यान, जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे खरेदी केंद्र कार्यान्वित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर शनिवार(ता.२८)पर्यंत १५० शेतकऱ्यांचा ७८० क्विंटल ५० किलो मूग आणि उडीद खरेदी करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात मात्र मूग, उडिदाची खरेदी झाली नाही. आर्द्रतचे प्रमाण १२ टक्के पेक्षा अधिक येत असल्यामुळे तीनही जिल्ह्यांमध्ये अद्याप सोयाबीनची खरेदी होऊ शकली नाही.

दरम्यान, जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे खरेदी केंद्र कार्यान्वित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने मूग, उडीद खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, बिलोली, देगलूर या ठिकाणी, परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत,गंगाखेड, पूर्णा या ठिकाणी, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा-बाजार असे तीन जिल्ह्यांत एकूण १२ खरेंद्री केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर मुगाची ५,५७५ रुपये प्रतिक्विंटल, उडिदाची ५,४०० रुपये प्रतिक्विंटल हमीदराने खरेदी केली जात आहे.

शनिवार (ता.२८) पर्यंत नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर ४१ शेतकऱ्यांचा २१० क्विंटल मूग आणि १०९ शेतकऱ्यांचा ५७० क्विंटल ५० किलो उडीद अशा एकूण १५० शेतकऱ्यांचा ७८० क्विंटल ५० किलो मूग, उडीद खरेदी करण्यात आला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील केंद्रावर १ शेतकऱ्याचा ४ क्विंटल ५० किलो मूग खरेदी करण्यात आला आहे.

धर्माबाद येथील केंद्रावर २ शेतकऱ्यांचा ३१ क्विंटल ५० किलो, बिलोली केंद्रावर ३ शेतकऱ्यांचा २९ क्विंटल ५० किलो असा एकूण ५ शेतकऱ्यांचा ६१ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील दोन केंद्रांवर ४० शेतकऱ्यांच्या २०५ क्विंटल ५० किलो मुगाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली केंद्रावर ३१ शेतकऱ्यांचा १६८ क्विंटल आणि वसमत येथील केंद्रावर ९ शेतकऱ्यांच्या ३१ क्विंटल मुगाचा समावेश आहे. हिंगोली येथील केंद्रावर १०४ शेतकऱ्यांच्या ५०९ क्विंटल ५० किलो उडीद खरेदी करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवर मूग, उडीद खरेदीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण १४ ते १८ टक्के येत असल्यामुळे तीनही जिल्ह्यातील केंद्रांवर अद्याप सोयाबीन खरेदी झाली नाही.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातील परभणी येथे ७७ शेतकऱ्यांनी, जिंतूर १२५, सेलू १८०, मानवत २००, गंगाखेड १०, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे ६०० शेतकऱ्यांनी, वसमत येथे १५०, जवळा बाजार येथे १२५ शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन विक्रासाठी नोंदणी केल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

उत्पादकतेचा अडसर
आॅनलाइन नोंदणीसाठी पीक पेरा प्रमाणपत्रासोबतच सरासरी पीक उत्पादकतेमुळे अडचणी येत आहेत. पीक कापणीनंतर कृषी विभागाने सादर केलेल्या सरासरी पीक उत्पादकतेच्या आकडेवारीच्या मर्यादेत मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी केली जात आहे. परंतु यामुळे सरासरी उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन मिळालेल्या शेतकऱ्यांची गोची होत आहे. परिमाणी अनेक शेतकरी खुल्या बाजारात कमी दराने विक्री करत आहेत.

केंद्र वाढविण्याची मागणी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी सोयाबीन खरेदीसाठी तीन जिल्ह्यांत १७ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. परंतु गावाच्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्र नसल्यामुळे वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जवळच्या बाजार समितीमध्ये सोयाबीन केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
आता खाण्यातही क्रिकेट !क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...