नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस

परभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १०७ मंडळांमध्ये मंगळवारी (ता. ५) वादळी वारे, विजांच्या कडकडाटात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी ओढ्य-नाल्यामधून पाणी वाहिले. बंधारे, शेततळ्यांमध्ये पाणी जमा झाले.

नांदेड जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळांमध्ये वळवाच्या पावसाने हजेरी लावली. नांदेड, भोकर, किनवट, हिमायनगर, नायगाव तालुक्यातील आठ मंडळामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात मंगळवारी (ता. ५) पहाटपासून विजांच्या कडकडाटात पावसास सुरवात झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत अनेक भागात रिमझीम पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील ३४ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. सलग दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे जिंतूर तालुक्यातील जलयुक्त शिवार शिवारअंतर्गत घेण्यात आलेल्या बंधारे, सलग खोल समतल चर, शेत तळ्यांमध्ये पाणी साचले.

हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांत पावसाचा जोर जास्त होता. वळवाच्या पावसामुळे शेतातील तणकट निघून पडणार आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामांना वेग येणार आहे. मोसमी पावसाचे आगमन होऊन यंदा लवकर खरिपाच्या पेरण्यांना सुरवात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंडळनिहाय झालेला पाऊस (मिमी) नांदेड जिल्हा वजीराबाद १३.८, तरोडा १४, बारूळ १७.८, मांडवी ५३.५, जवळगाव ३२.५, सिंधी १३.३, नायगाव १९.५. परभणी जिल्हा ःपरभणी शहर २७, परभणी ग्रामीण २४, सिंगणापूर ३०, दैठणा २५, झरी १६, पिंगळी २२, जांब १०, जिंतूर २८, सावंगी म्हा.१८, बोरी २४, आडगाव १२, बामणी १५,देऊळगाव २०, कुपटा १२, वालूर १८, चिकलठाणा २०, गंगाखेड १२, महातपुरी १०, पालम २०, हिंगोली जिल्हा ः माळहिवरा ९, नरसी नामदेव ९, आखाडा बाळापूर २६, पानकनेरगाव १३, हट्टा १२, आंबा १६, औंढा नागनाथ १४, जवळा बाजार १८, येळेगाव १३, साळणा १६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com