agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingol in Start sowing | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत लांबणीवर पडलेली पेरणी सुरू
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जून 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता. २४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १०४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील सरसम (ता. हिमायतनगर) मंडळात (६९ मिमी) अतिवृष्टी झाली. पावसाच्या खंडामुळे लांबणीवर पडलेली पेरणी चांगल्या पावसामुळे सुरू झाली आहे.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता. २४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १०४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील सरसम (ता. हिमायतनगर) मंडळात (६९ मिमी) अतिवृष्टी झाली. पावसाच्या खंडामुळे लांबणीवर पडलेली पेरणी चांगल्या पावसामुळे सुरू झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी सकाळी आठपर्यंत नांदेड, मुदखेड, हिमायतनगर, हदगाव, भोकर, उमरी, बिलोली, नायगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा तालुक्यांतील ५३ मंडलामध्ये पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील ३४ मंडलामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला; परंतु अनेक भागात पावसाचा जोर कमी होता. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुके वगळता अन्य तालुक्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. सर्व पाच तालुक्यांतील १७ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नांदेड जिल्हा ः नांदेड शहर ७, नांदेड ग्रामीण ५,  वसरणी १५, तुप्पा १२, विष्णुपुरी ७, मुदखेड १९, मुगट ११, बारड ५४, हिमायतनगर १८, सरसरम ६९, जवळगाव १२, पिंपरखेड ६०, निवघा ३२, तळणी ५, भोकर २५, मोघाळी २०, किन्ही ३६, उमरी ११, सिंधी १६, गोलेगाव १०, कुंडलवाडी ५, नायगाव ५, मांजरम ७, बरबडा ६, कुंटूर ६, देगलूर १०, मरखेल ३४, मालेगाव १२, जांब १८ , माळकोळी ११, शेवडी १०, सोनखेड ३६.
परभणी जिल्हा ः सिंगणापूर १०, झरी ७, पेडगांव ५, जिंतूर ६, सावंगी म्हा.८, बामणी ११,कोल्हा ३७, गंगाखेड २२, राणीसावरगाव ६, माखणी १६, महातपुरी १७, पालम ५, चाटोरी २४, पूर्णा ७, ताडकळस ६.

हिंगोली जिल्हा ःहिंगोली १७, माळहिवरा ८, डिग्रस १७, नांदापूर ११, आखाडा बाळापूर ५७, वारंगा ७, सेनगाव ९, गोरेगाव १४, आजेगाव २८, औंढा नागनाथ ५०, येळेगाव ५, साळणा ८.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...