agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingoli in 14 talukas Drought shadow | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत १४ तालुक्यांत दुष्काळी छाया
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पावसाच्या ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांकापैकी पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांकानुसार दुष्काळाची प्रथम कळ (ट्रिगर-१) लागू पडत आहे. या १४ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची तत्काळ अमंलबजावणी करणे आवश्यक आहे.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पावसाच्या ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांकापैकी पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांकानुसार दुष्काळाची प्रथम कळ (ट्रिगर-१) लागू पडत आहे. या १४ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची तत्काळ अमंलबजावणी करणे आवश्यक आहे.

प्रचलित कार्यपद्धतीनुसार पैसेवारी, पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्षात आढळून आलेल्या नुकसानीच्या अंदाजावरून दुष्काळ जाहीर केला जात असे. गतवर्षीपासून दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषात आणि कार्यपद्धतीत बदल करण्यात आले आहेत. अनेक निर्देशांक लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात अपेक्षित सरासरी पावसाच्या ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या तीन जिल्ह्यांतील १४ तालुक्यांत अनिवार्य निर्देशांकापैकी पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांकानुसार दुष्काळाची प्रथम कळ (ट्रिगर-१) लागू पडत आहे.

पावसाच्या चार आठवड्यांहून अधिक खंडामुळे सर्वच तालुक्यांतील पीक स्थिती विदारक असून उत्पादनाक मोठी घट येत आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यात सरासरी ८८२.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात सरसरी ७४९.४ मिमी (८४.९ टक्के) पाऊस झाला. चार तालुक्यांत ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात सरासरी ७२१.६ मिमी पाऊस अपेक्षित आहे परंतु प्रत्यक्षात सरासरी ४९४.२ मिमी (६८.५ टक्के) पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या आठ तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरी पावसाच्या ७५ टक्के कमी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात सरासरी ८३८.५ मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात ६८४.३ मिमी (८१.६ टक्के) पाऊस झाला. वसमत आणि सेनगांव या दोन तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरी पावसाच्या ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. सद्यस्थितीत या तीन जिल्ह्यांतील सर्वच तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...