agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingoli average rainfall more than average | Agrowon

जून महिन्यात नांदेड, परभणी, हिंगोलीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातील १७, परभणीतील ११ आणि हिंगोली जिल्ह्यातील ७ अशा एकूण ३५ मंडळांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली नाही. नांदेड जिल्ह्यातील हानेगाव (ता. देगलूर) मंडळामध्ये सर्वात कमी ५७ मिलिमीटर (सरासरीच्या ३५.६ टक्के) तसेच परभणी जिल्ह्यातील बाभळगाव (ता. पाथरी) येथे ५८ मिलिमीटर (६२.७ टक्के) पाऊस झाला आहे. त्यामुळे या मंडळांतील पेरणी अद्याप रखडलेलीच आहे.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातील १७, परभणीतील ११ आणि हिंगोली जिल्ह्यातील ७ अशा एकूण ३५ मंडळांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली नाही. नांदेड जिल्ह्यातील हानेगाव (ता. देगलूर) मंडळामध्ये सर्वात कमी ५७ मिलिमीटर (सरासरीच्या ३५.६ टक्के) तसेच परभणी जिल्ह्यातील बाभळगाव (ता. पाथरी) येथे ५८ मिलिमीटर (६२.७ टक्के) पाऊस झाला आहे. त्यामुळे या मंडळांतील पेरणी अद्याप रखडलेलीच आहे.

नांदेडची जून महिन्याची पावसाची सरासरी १६४.८ मिलिमीटर आहे. परंतु यंदा जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी २५४.७ मिलिमीटर (१५१.२ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्याने जरी पावसाची सरासरी ओलांडली असली तरी बिलोली तालुक्यातील सगरोळी, आदमापूर या २, मुखेड तालुक्यातील येवती, जहूर, चांदोला, बाऱ्हाळी, मुक्रमाबाद या ५, देगलूर तालुक्यातील देगलूर, खानापूर, मरखेल, मालेगाव, हानेगाव या ५, किनवटमधील ईस्लापूर, जलधारा, शिवणी, दहेली या ४, माहूर तालुक्यातील जारिकोट १ मंडळामध्ये अशा एकूण १७ मंडळांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. बारड (ता. मुदखेड) मंडळामध्ये सर्वाधिक ४८५ मिलिमीटर (२४९.२ टक्के) तर हानेगाव (ता. मुखेड) मंडळामध्ये सर्वात कमी ५७ मिलिमीटर (३५.६ टक्के) पाऊस झाला.

परभणीत जून महिन्याची सरासरी १२६.६ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात १७३.७ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १३७.२ टक्के पाऊस झाला. परंतु परभणी तालुक्यातील पेडगाव, जांब, सिंगणापूर, पिंगळी, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, पाथरी तालुक्यातील पाथरी, बाभळगाव, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, आडगाव, सेलू  तालुक्यातील वालूर, कुपटा या ११ मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. ताडकळस (ता. पूर्णा) मंडळामध्ये सर्वाधिक ३०५ मिलिमीटर (२०७ टक्के) तर बाभळगाव (ता. पाथरी) मंडळामध्ये सर्वात कमी ५८ मिलिमीटर (६२ टक्के) पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्याची जूनची पावसाची सरासरी १६८.५ मिलिमीटर आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात २५४.७ म्हणजेच सरासरीच्या १५१.२ टक्के पाऊस झाला. जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली असली तरी ७ मंडळांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस अाहे.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...