agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingoli in crop on Disease attack | Agrowon

पावसाचा खंड त्यात किडींनी काढले डोके वर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. वाढीसाठी पोषक वातावरणामुळे विविध प्रकाराच्या किडींनी डोके वर काढले आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या प्राद्रुर्भावाची व्याप्ती वाढत चाललेली असताना मूग, सोयाबीन आदी पिकांवर देखील विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. वाढीसाठी पोषक वातावरणामुळे विविध प्रकाराच्या किडींनी डोके वर काढले आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या प्राद्रुर्भावाची व्याप्ती वाढत चाललेली असताना मूग, सोयाबीन आदी पिकांवर देखील विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जून महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात मात्र बहुतांश भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. या तीन जिल्ह्यांतील अनेक तालुक्यात १५ ते २० दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. अजून काही दिवस पाऊस येण्याचा अंदाज नसल्याने खंडाचा कालावधी दीर्घ राहू शकतो. पावसाअभावी जमिनीला भेगा पडल्या आहेत. विविध किडींच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. किटकांच्या नर- मादी पतंगाचे मिलन होऊन अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्यांची संख्या वाढत चालली आहे. कपाशीचे पीक पाते, फुले तसेच बोंडे भरण्याच्या अवस्थेत आहे. अनेक तालुक्यात गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे.

मावा, तुडतुडे फुलकिडे आदी रसशोषण करणाऱ्या किडींचा प्राद्रुर्भाव देखील आढळून आला आहे. सोयाबीनचे पीक वाढीच्या तसेच फुलोरा अवस्थेत आहे. हलक्या, बरड जमिनीवरील तसेच पाऊस कमी पाऊस झालेल्या भारी जमिनीवरील पिके दुपारच्या उन्हात सुकून जात आहेत. सोयाबीनवर शेंडे, पाने खाणारी अळी, चक्री भुंगा आदी किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.

कपाशीवर बोंड अळी तर मुगावर रसशोषक किडी दिसत आहे.
- बाळासाहेब रनेर, शेतकरी, बाभळगाव, जि. परभणी

यंदा बोंड अळी लवकर आली आहे. पाण्याचा ताण बसला आहे.
- गुलाबराव मुंढे, शेतकरी,
केळी, जि. हिंगोली

किडींमुळे शेतकरी भांबावून गेले असून चिंतातूर झाले आहेत.
- गोपाळ पाटील, इजळी, जि. नांदेड.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत माहिती दिली जात आहे. वेळीच उपाययोजना केलेल्यांना चांगले परिणाम दिसत आहेत. किडी धूऊन जाण्यासाठी पावसाची गरज आहे.
- डॉ. पी. एस. झंवर, कीटकशास्त्र विभाग प्रमुख, वनामकृवि, परभणी.

इतर अॅग्रो विशेष
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...
खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप...पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड...
केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामालजळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात,...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशानपुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन...
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे...युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय...
कामगंध सापळ्यांमध्ये होतेय ‘बनवाबनवी’अकोला ः बोंड अळीमुळे गेल्या हंगामात झालेले नुकसान...
वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची...रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून...
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...