नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपैकी २०१६ वगळता अन्य तीन वर्षांमध्ये पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नव्हती. गतवर्षी या तीन जिल्ह्यांत वार्षिक सरासरीपेक्षा २५.७० ते ३३.७४ टक्के कमी पाऊस झाला. पावसाच्या तुटीमुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट आली होती. यंदा समाधानकारक पाऊस व्हावा पिकांचे चांगले उत्पादन यावे, योग्य बाजारभाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. या तीन जिल्ह्यांमध्ये २०१४, २०१५, २०१७ या तीन वर्षी वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता.

गतवर्षी या तीन जिल्ह्यांत जून ते आॅक्टोबर या कालावधीत अनुक्रमे ४९, ७८, ६१ दिवस पावसाचा खंड पडला (ड्रायस्पेल) होता. त्यामुळे पीक उत्पादनात घट येऊन शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या उद्भवली. नांदेड जिल्ह्यांची वार्षिक पावसाची सरासरी ९५५.५५ मिलिमीटर आहे. जिल्ह्यांत २०१४ मध्ये ४३३.९१ मिमी (४५.४१ टक्के), २०१५ मध्ये ४६४.११ मिमी. (४८.५७ टक्के), २०१६ मध्ये १०८० मिमी (११३.०७ टक्के), २०१७ मध्ये ६३५.६३ मिमी (६६.५२ टक्के) पाऊस झाला होता.

परभणी जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी ७७४.५ मिलिमीटर आहे. जिल्ह्यांत २०१४ मध्ये ३५७.३७ मिमी (४६.७८ टक्के), २०१५ मध्ये ३४०.४६ मिमी (४३.४६ टक्के), २०१६ मध्ये ८३८.०४ मिमी (१०८.२६ टक्के), २०१७ मध्ये ५२९.५ मिमी (६८.३६ टक्के) पाऊस झाला होता.

हिंगोली जिल्ह्यांची वार्षिक पावसाची सरासरी ८९०.३९ मिमी आहे.जिल्ह्यांत २०१४ मध्ये ४५२.५२ मिमी (५०.८२ टक्के), २०१५ मध्ये ५७२.०२ मिमी (६४.२४ टक्के), २०१६ मध्ये ९३४.२६ मिमी (१०४.९३ टक्के), २०१७ मध्ये ६६१.५५ मिमी (७४.३० टक्के) पाऊस झाला होता. यंदा मंगळवार (ता.१२) पर्यंत नांदेड जिल्ह्यात १७४.१९ मिमी, परभणी जिल्ह्यात १११.२५ मिमी., हिंगोली जिल्ह्यांत ११६.०७ मिमी पाऊस झाला आहे.

वर्षनिहाय तुलनात्मक पर्जन्यमान स्थिती (मिमीमध्ये)
जिल्हा २०१४ २०१५ २०१६ २०१७
नांदेड ४३३.९१ ४६४.११ १०८०.४४ ६३५.६३
परभणी ३५७.७३ ३४०.४६ ८३८.०४ ५२९.५
हिंगोली ४५२.५२ ५७२.०२ ९३४.२६ ६६१.५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com