agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingoli in take tures 93 crores | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत तुरीचे ९३ कोटींचे चुकारे अदा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १५ हजार ६२५ शेतकऱ्यांना तुरीचे ९३ कोटी ८१ लाख ९७ हजार ९४० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अद्याप १३ हजार ४४८ शेतकऱ्यांचे ९४ कोटी २८ लाख ८० हजार रुपयांचे चुकारे अडकलेले आहेत. गुरुवार (ता. ७)पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकारे जमा करण्याचे आदेश असल्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १५ हजार ६२५ शेतकऱ्यांना तुरीचे ९३ कोटी ८१ लाख ९७ हजार ९४० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अद्याप १३ हजार ४४८ शेतकऱ्यांचे ९४ कोटी २८ लाख ८० हजार रुपयांचे चुकारे अडकलेले आहेत. गुरुवार (ता. ७)पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकारे जमा करण्याचे आदेश असल्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, आॅनलाइन नोंदणी केलेल्या, परंतु तूर खरेदी न केलेल्या तीन जिल्ह्यांतील ३३ हजार ९६ शेतकरी `भावांतर` योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. हरभरा खरेदी परत सुरू करण्याचे आदेश बुधवारी (ता. ६) दुपारपर्यंत प्राप्त झाले नव्हते. नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत १५ मेपर्यंत नोंदणी केलेल्या ६२ हजार १६८ शेतकऱ्यांपैकी २९ हजार ७२ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १५२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. सोमवार (ता. ४)पर्यंत यापैकी १५ हजार ६२४ शेतकऱ्यांना ९३ कोटी ८१ लाख ९७ हजार ९४० रुपये एवढ्या रक्कमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १० हजार ७७० शेतकऱ्यांना ५४ कोटी २९ लाख २२ हजार रुपये, परभणी जिल्ह्यातील १ हजार ९३१ शेतकऱ्यांना २२ कोटी २८ लाख ६२ हजार ६१४ रुपये, हिंगोली जिल्ह्यातील २ हजार ९२३ शेतकऱ्यांना १६ कोटी ८१ लाख ९७ हजार ९४० रुपये यांचा समावेश आहे. अजून या तीन जिल्ह्यांतील १३ हजार ४४८ शेतकऱ्यांचे ९४ कोटी २८ लाख ८० हजार ४६० रुपयांचे चुकारे अडकलेले आहेत. तीन जिल्ह्यांतील खरेदी केंद्रावर ४१ हजार क्विंटल तूर आणि हरभरा पडून आहे. त्यामुळे तूर तसेच हरभऱ्याचे चुकारे अद्याप अडकलेलेच आहेत.

३३ हजार शेतकरी ‘भावांतर’साठी पात्र
या तीन जिल्ह्यांतील खरेदी केंद्रावर आॅनलान नोंदणी केलेल्यांपैकी ३३ हजार ९६ शेतकऱ्यांची तूर खरेदी झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या भावांतर योजनेच्या लाभासाठी हे शेतकरी पात्र ठरणार आहेत.

हरभरा खरेदीचे आदेश पोचले नाहीत
हरभरा खरेदीसाठी १३ जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु बुधवारी (ता. ६) दुपारपर्यंत खरेदी सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे खरेदी सुरू होऊ शकली नाही. तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या २८ हजार ४१९ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप राहिले आहे. खरेदी सुरू झाली तरी १३ जूनपर्यंत जेमतेम एक हजार ते दीड हजार शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी होऊ शकेल. २५ हजारहून अधिक शेतकरी शिल्लक राहतील. या शेतकऱ्यांनादेखील `भावांतर` योजनेचा लाभ द्यावा लागणार आहे.

इतर बातम्या
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
बांगलादेशातील रेशीम उद्योग...प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंदसांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर...नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया...