ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवर

ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवर
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवर

जळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील दोन कारखाने आघाडीवर आहेत. जळगाव जिल्ह्यातीलही तीन कारखाने जोमात कार्यवाही करीत आहेत. मध्यंतरी ऊसतोड मजूर व इतर समस्या आल्याने चोपडा तालुक्‍यात तोडणी रखडली होती. नाशिक व औरंगाबादमधील कारखानेदेखील जळगाव, धुळे जिल्ह्यातून अजूनही ऊस वाहतूक करीत असल्याची स्थिती आहे.  

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्‍यात मुक्ताई, भोरस (ता. चाळीसगाव) येथील बेलगंगा (अंबाजी) व यावल तालुक्‍यात फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान सुरू आहे. या महिन्याच्या मध्यापर्यंत मुक्‍ताई शुगरने सुमारे १ लाख ५३ हजार ८२५ लाख, मधुकर साखर कारखान्याने सुमारे ४८ हजार मेट्रिक टनांवर ऊस गाळप केला. बेलगंगा कारखाना उशिरा सुरू झाला. तरीदेखील या कारखान्याचा गळीत हंगाम बऱ्यापैकी सुरू असून, सुमारे १३ हजार टनांचे गाळप त्यात झाले. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्‍यातील सातपुडा साखर कारखान्याने १ लाख ९८ हजार ८०० मेट्रिक टन, समशेपूर (ता. नंदुरबार) येथील आयर्न शुगरने २ लाख ४० हजार ५०० टनाचे ऊस गाळप केले. त्यात २ लाख ३३ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याने ७९ हजार ९६५ टन ऊस गाळप केले. नव्या वर्षात खानदेशातील विविध साखर कारखान्यांमध्ये मिळून सहा लाख ५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

चोपडा तालुक्‍यातील चोपडा सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे या तालुक्‍यांतून नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस वाहतूक करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com