agriculture news in marathi, narayan rane appeal to the agitator, munbai, maharashtra | Agrowon

मुख्‍यमंत्री मोर्चाच्‍या नेत्‍यांशी बोलू इच्छितात : नारायण राणे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई  :  ''आरक्षणासाठी चालू असलेले हिंसक आंदोलन थांबावे ही मुख्‍यमंत्र्यांची इच्‍छा आहे. मराठा समाजाला त्‍वरित आरक्षण मिळावे, अशी माझीही मागणी आहे. यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीसही सकारात्‍मक आहेत. यासाठी ते मराठा क्रांती मोर्चाच्‍या नेत्‍यांशी बोलू इच्छितात. आंदोलकांनीही तुटेपर्यंत ताणू नये,'' असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी सांगितले.

मुंबई  :  ''आरक्षणासाठी चालू असलेले हिंसक आंदोलन थांबावे ही मुख्‍यमंत्र्यांची इच्‍छा आहे. मराठा समाजाला त्‍वरित आरक्षण मिळावे, अशी माझीही मागणी आहे. यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीसही सकारात्‍मक आहेत. यासाठी ते मराठा क्रांती मोर्चाच्‍या नेत्‍यांशी बोलू इच्छितात. आंदोलकांनीही तुटेपर्यंत ताणू नये,'' असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात श्री. राणे यांनी मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली. त्‍यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्‍हणाले, की राज्‍यात चालू असलेला हिंसाचार थांबावा म्‍हणून आपण मुख्‍यमंत्र्यांना भेटलो. तसेच, याबाबत आपण मराठा क्रांती मोर्चाच्‍या नेत्‍यांनाही भेटलो आहोत. मराठा नेत्‍यांनी आपल्‍याला काही मुद्दे सांगितले आहेत. ते आपण मुख्‍यमंत्र्यांच्‍या कानावर घालणार आहोत. त्‍यांना ते पटले तर पुढील दोन दिवसांत आपण आंदोलनाचे नेतृत्‍व करणाऱ्या मराठा नेत्‍यांची आणि मुख्‍यमंत्र्यांची भेट करवून देऊ.

काँग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या काळात मराठा आरक्षणासाठी स्‍थापन केलेल्‍या राणे कमिटीने शै‍क्षणिक आणि सामाजिक निकषांवरच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, न्‍यायालयाने नंतर ते रद्द केले. आताही या दोन निकषांच्‍या आधारे मराठा समाजाला आरक्षण देता येते. याबाबतचा निर्णय मुख्‍यमंत्री आणि मराठा नेत्‍यांनी चर्चेद्वारे घ्यावा, असे श्री. राणे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...