agriculture news in marathi, Narayan Rane oppose Shivsenas stand on Nanar oil refinery | Agrowon

नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरुन शिवसेनेला लक्ष्य 
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जानेवारी 2018

मुंबई : नाणार (ता. राजापूर) येथील प्रस्तावित हरित तेलशुध्दीकरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे अशोक वालम यांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ’मातोश्री‘वर बोलावून धमकी दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

मुंबई : नाणार (ता. राजापूर) येथील प्रस्तावित हरित तेलशुध्दीकरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे अशोक वालम यांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ’मातोश्री‘वर बोलावून धमकी दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

या वेळी उपस्थित असलेले वालम यांचे चिरंजीव विनय यांनी मातोश्रीवरच्या बैठकीचा घटनाक्रम कथन करून राणेंच्या आरोपाला दुजोरा दिला. तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही सुरू आहे. पोलिस आणि महसूल खात्याचे अधिकारी शेतकऱ्यांना धमकावून जमिनीचे संपादन करीत आहेत. कोकणच्या मुळावर उठणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला आपला विरोध आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात रत्नागिरी दौऱ्यात नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. आता नारायण राणे यांनीही प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याने प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी सापडण्याची चिन्हे आहेत. नाणार परिसरातील १६ गावांतील शेतकऱ्यांची प्रकल्पाला असहमती आहे. प्रकल्पाला विरोध वाढू लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वालम यांना मातोश्रीवर बोलावून घेऊन प्रकल्पाविरोधात आरडाओरड करू नका, शिवसेना नेत्यांच्या विरोधात बोलू नका, अशी धमकी दिल्याचे राणे म्हणाले. 

‘शिवसेनेची दुटप्पी भूमिका’ 
तेलशुद्धीकरण प्रकल्प हा आंध्र प्रदेशला जाणार होता. मात्र, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट घातला. त्यामुळे शिवसेनेचा प्रकल्पाला होणारा विरोध म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. गुजरातमधील भूमाफियांसाठी प्रकल्प आखला जात असल्याचा राऊत यांचा आरोप हास्यास्पद आहे. स्वतः राऊत, आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. कमी भावात जमीन घेऊन त्या सरकारला मोठ्या किंमतीत दिल्या जाणार आहेत. प्रकल्पाला विरोध असेल तर तो लादला जाणार नाही असे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणतात. मग उद्योगमंत्र्यांनी प्रस्तावावर सही कशी केली? भूसंपादनासाठी महसूल खात्याकडून नोटीसा का बजावल्या जात आहेत? असे सवाल राणे यांनी केले. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...