विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा ः नरेंद्र मोदी

मुंबई ः ‘आयआयटी’च्या ५६ व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात शनिवारी (ता. ११) पार पडला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.
मुंबई ः ‘आयआयटी’च्या ५६ व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात शनिवारी (ता. ११) पार पडला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईला केंद्र शासनाच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने एक हजार कोटी रुपयांचे साहाय्य देण्यात आले आहे. त्यातून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होणार असून, संशोधन आणि नाविण्यपूर्णतेवर विद्यार्थ्यांनी विशेष भर द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. ११) केले.  ‘आयआयटी’ मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास राज्यपाल  विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते.  या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, की गेल्या सहा दशकांत आयआयटीने केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे आज या संस्थेने देशातील नामांकित संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आयआयटी आणि येथील पदवीधरांच्या उल्लेखनीय कार्याचा राष्ट्राला अभिमान आहे. आयआयटीच्या यशाने देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती झाली, ज्यांची आयआयटी ही प्रेरणा आहे, यामुळे भारत हे जगातील सर्वात मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र बनले आहे. आयआयटीला देशात, जगात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जात असले तर आज त्याची व्याख्या बदलली आहे, हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिली नाही तर आयआयटी म्हणजे इंडियाज इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (भारताच्या परिवर्तनाचे साधन) झाले आहे.  नाविन्यता आणि उद्योगासाठी भारत हे जगाचे आकर्षण केंद्र व्हावे, यादृष्टीने आपण प्रयत्न करीत असून, हे केवळ शासनाच्या प्रयत्नांतून नाही होणार तर त्यासाठी आपल्यासारख्या तरुणांची आवश्यकता आहे, अशा नाविण्यपूर्ण संकल्पना आयआयटीसारख्या कॅम्पसमधून आणि आपल्यासारख्या युवकांच्या मनातून निर्माण होतील, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी व्यक्त केला.  २६२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान तर ३८० विद्यार्थी पीएच.डी.  आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात २६२१ विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी प्रदान करण्यात आली तर ३८० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले. आयआयटी मुंबई आणि मोनाश विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या पीएचडी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मोनाश विद्यापीठाचे कुलगुरू तथा अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांच्या हस्ते २९ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com