पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत गटांना मार्गदर्शन

 नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता. १६) पांढरकवडा दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा संभाव्य दौरा एक तासाचा राहणार असून महिला बचत गटांना मार्गदर्शन, केंद्रीय रस्ते निधीतून मंजूर ४८५ कोटी रुपयांच्या दहा रस्ते कामांचे भूमिपूजन त्यासोबतच वर्धा-नांदेड-यवतमाळ रेल्वमार्गाचा शिलान्यास ते करतील.   महिला बचतगटांच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी पांढरकवडा येथे येत आहेत. या माध्यमातून लोकसभा निवडणुकांचा बिगूल ते फुंकणार असून त्या पार्श्‍वभूमीवर अनेक लोकप्रिय घोषणा करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. एकूण ३० एकरांवर होणाऱ्या या कार्यक्रमाकरिता भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळाला छावणीचे स्वरूप आले असून अडीच हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महिला मेळाव्यासोबतच जिल्ह्यात केंद्रीय रस्ते विकास निधीमधून नुकतीच ४८५ कोटी रुपयांची दहा कामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजनही ते करणार आहेत.  याशिवाय वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पाचा शिलान्यास केला जाणार आहे. दोन्ही प्रकल्पांची लघुचित्रफित दाखविण्यात येण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान आवास योजनेतील तीन लाभार्थ्यांना घरकुलाची चावी देण्यात येईल. दोन लाभार्थ्यांना प्लॉट वाटपाचे प्रमाणपत्र पंतप्रधानाच्या हस्ते देण्याची शक्‍यता आहे. पशु सखी, मत्स्य सखी व बकरीच्या दुधापासून साबण तयार करणाऱ्या महिला बचतगटांचा गौरव या वेळी केला जाणार आहे. 

यांची राहील उपस्थिती राज्यपाल सी. विद्यासागरराव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार या वेळी उपस्थित राहतील. दरम्यान, पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदी यांनी दाभडी गावातील शेतकऱ्यांशी चाय पे चर्चा कार्यक्रमात एकूण २४ दिली होती. त्याला आज पाच वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला असताना यातील एकाही आश्‍वासनाची पूर्तता मोदी यांनी केली नाही. त्यामुळे पांढरकवडा दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधानांना भेटण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी दाभडी ग्रामस्थांची आहे. या संदर्भाने देण्यात आलेल्या निवेदनाच्या वेळी शेतकरी महादेव राऊत, माधव काळे, विनोद डीके, बाबाराव कोल्हे, विनोद इंगळे व इतरांची उपस्थिती होती. दाभडी ग्रामस्थांचे पुन्हा चाय पे चर्चेचे आमंत्रण पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदी यांनी दाभडी गावातील शेतकऱ्यांशी चाय पे चर्चा कार्यक्रमातून संवाद साधला होता. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच एकूण २४ आश्‍वासने त्यांनी या वेळी दिली होती. त्याला आज पाच वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला असताना यातील एकाही आश्‍वासनाची पूर्तता मोदी यांनी केली नाही. त्यामुळे दाभडी येथील शेतकरी पांढरकवडा येथे आयोजित मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. उर्वरित शेतकरी दाभडी येथे २०१४ मध्ये ज्या ठिकाणी मोदींचा कार्यक्रम झाला होता, त्या ठिकाणी त्यांची वाट पाहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com