अांतरराष्ट्रीय बायर-सेलर समिटमध्ये ‘नरनाळा’ शेतकरी कंपनी

अांतरराष्ट्रीय बायर-सेलर समिटमध्ये ‘नरनाळा’ शेतकरी कंपनी
अांतरराष्ट्रीय बायर-सेलर समिटमध्ये ‘नरनाळा’ शेतकरी कंपनी

अकोला ः गेल्या वर्षीपासून जिल्ह्यातील केळी विदेशात निर्यात व्हायला सुरवात झाली अाहे. या वर्षी निर्यातक्षम केळी पिकविण्यासाठी अकोट, तेल्हारा तालुक्यांत लागवडही मोठ्या क्षेत्रावर करण्यात अाली अाहे. यातीलच पुढील पाऊल म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्यांची ‘नरनाळा’ ही शेतकरी कंपनी अाता निर्यातीच्या क्षेत्रातही पाऊल टाकत अाहे.  मुंबईत मंगळवारी (ता. १५) झालेल्या निर्यातदार-अायातदारांच्या ‘बायर-सेलर’ समिटमध्ये ही एकमेव शेतकरी कंपनी सहभागी झाली होती. कंपनीचे संचालक पंजाबराव बोचे, संचालक (निर्यात) मोहन सोनोने, प्रशासनाच्या वतीने  उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी या समिटमध्ये नेतृत्व केले. देशातील फळपिके, भाजीपाला अायात -निर्यातीच्या दृष्टीने अपेडाच्या पुढाकाराने मुंबईत ही अांतरराष्ट्रीय दोनदिवसीय समिट घेण्यात अाली. निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने विविध देशांमधील या क्षेत्रात काम करणारे मान्यवर सहभागी झाले होते. या समिटमध्ये केळी उत्पादक शेतकरी कंपनीने लावलेल्या स्टॉलला देशविदेशातील निर्यातदारांनी भेट देऊन चर्चा केली. शासन तसेच अपेडाच्या अधिकाऱ्यांनी स्टॉलला भेट दिली. तसेच अकोला जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय यांनी केळी निर्यातीच्या दृष्टीने सुरू केलेल्या कामांचे कौतुक केले. या वर्षी या कामाने अधिक गती घेतली. सध्याची निर्यात निर्यातदारांच्या पुढाकारातून होत अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com