मुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु
ताज्या घडामोडी
नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या यंत्रनेने 'स्टार केप्लर-90' या नावाने आठ ग्रहांचा समावेश असलेल्या नवीन सौर मंडळाचा शोध लावला आहे. नासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपच्या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेने हा शोध लावला आहे.
नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या यंत्रनेने 'स्टार केप्लर-90' या नावाने आठ ग्रहांचा समावेश असलेल्या नवीन सौर मंडळाचा शोध लावला आहे. नासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपच्या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेने हा शोध लावला आहे.
'केप्लर-90आय' हे ग्रह प्रथमच आपल्या सौर मंडळाच्या रूपात मोठ्या संख्येने ग्रहमाला होस्ट करू शकतील, अशी माहिती एका खगोलशास्त्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. मानवी बुध्दी आणि यंत्रे यांच्या एकत्रित वापराने आपल्या सौर मंडळ नजिकच्या सौर मंडळात नेमके काय आहे याविषयी शोध सुरु आहे. 'केप्लर-90आय' एक लहान खडकाळ पृथ्वीसारखा ग्रह आहे. परंतु सुर्याच्या अगदी जवळ आहे. जो आपल्या ग्रहमालेतील सुर्यापेक्षा जास्त गरम आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा अडीच हजार प्रकाश वर्षे जुना आहे. हा ग्रह इतका उष्ण आहे की यावर जीवन शक्य नाही. या मालेतील इतर ग्रहांवर जीवन शक्य असू शकते असा अंदाज आहे. नासाला आता असे वाटते की अंतराळातील बहुतेक ग्रहांमध्ये ग्रहांची कक्षा (ग्रहमाला) असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पृथ्वीप्रमाणे जीवन असण्याची स्थिती अधिक विकसित होण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टनमधील नासाच्या ऍस्ट्रोफिशिक्स डिव्हिजनच्या संचालक पॉल हर्टझ यांनी 'केप्लरने आधीपासूनच आम्हाला बहुतांश तारे दाखवले आहेत. आज केप्लरने पुष्टी केली की आपल्या सौर मंडळासारखे हे देखील ग्रहांचे मोठे कुटुंब असू शकतात.' केप्लर-90आय हा त्याच्या सुर्यमालेत पृथ्वीप्रमाणेच तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्या कक्षेतील दर 90बी आणि 90सी हे दोन लहान ग्रह अनुक्रमे सात व नऊ दिवसांनी केप्लर-90 च्या भोवती फिरतात.
- 1 of 143
- ››