agriculture news in marathi, NASA soil moisture data advances global crop forecasts | Agrowon

मातीतील आर्द्रतेच्या माहितीसाठ्यावरून मिळू शकेल जागतिक पीक अंदाज
वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्था (नासा) यांच्यातर्फे खास मातीतील ओलाव्याचे प्रमाण मोजण्यासाठी उपग्रह पाठवण्यात आला होता. त्याच्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे अमेरिकन कृषी विभागाने जागतिक कृषी क्षेत्र आणि विविध पिकांच्या उत्पादनावर लक्ष ठेवण्यात येत आहे. या माहितीतून पिकांच्या उत्पादनाचे अंदाज आधीच मिळवणे शक्य होणार आहे.

अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्था (नासा) यांच्यातर्फे खास मातीतील ओलाव्याचे प्रमाण मोजण्यासाठी उपग्रह पाठवण्यात आला होता. त्याच्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे अमेरिकन कृषी विभागाने जागतिक कृषी क्षेत्र आणि विविध पिकांच्या उत्पादनावर लक्ष ठेवण्यात येत आहे. या माहितीतून पिकांच्या उत्पादनाचे अंदाज आधीच मिळवणे शक्य होणार आहे.

अमेरिकेतील नासा या संस्थेने २०१५ मध्ये मातीतील आर्द्रता मोजण्याच्या उद्देशाने खास एक उपग्रह (The Soil Moisture Active Passive mission, किंवा SMAP) पाठवला होता. त्याकडून गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये उपलब्ध होत असलेल्या माहितीची सांगड अमेरिकी कृषी विभागाच्या परकीय कृषी सेवेच्या माहितीशी घालण्यात येत आहे. त्याद्वारे जगभरातील कृषी क्षेत्रामध्ये दुष्काळ किंवा पूरप्रवण स्थितीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे विविध विभागांतील मातीचा ओलावा, तापमान, पावसाचे प्रमाण, हिरवळीचे प्रमाण आणि एकूण पिकांची स्थिती समजण्यास मदत होणार आहे.

  • जागतिक पीक उत्पादनाच्या स्थितीमुळे अर्थव्यवस्था, सामाजिक आणि मानवता अशा अनेक घटकांवर मोठा परिणाम होतो. पिकाच्या उत्पादनावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याची उपलब्धता. त्यावर या उपक्रमामध्ये लक्ष ठेवण्यात येत असल्याचे गोडार्ड येथील संशोधिका इलियाना एमलॅडेनोव्हा यांनी सांगितले.
  • पाऊस आणि तापमान यांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणावरून संगणकीय प्रारूपाद्वारे मातीतील आर्द्रता मोजण्यात येते. ज्या भागामध्ये हवामान मोजण्याची यंत्रे उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी काही प्रमाणात त्रुटी राहत असल्या तरी अंदाज मिळण्यासाठी या यंत्रणेचा चांगला उपयोग होतो. या मातीच्या आर्द्रतेच्या माहितीच्या विश्लेषणासाठी ऑनलाइनही काही साधने (उदा. गुगल अर्थ इंजिन) उपलब्ध आहेत. त्यामुळे या माहितीचा उपयोग जगभरातील शास्त्रज्ञही करू शकतील.

अधिक माहितीसाठी वेबसाइट ः
http://smap.jpl.nasa.gov
https://ipad.fas.usda.gov/cropexplorer/
https://explorer.earthengine.google.com/#detail/NASA_USDA%२FHSL%२FSMAP_soil_moisture

 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...