agriculture news in marathi, Nashik anilmal husbandry department third in tagging animals in distrct | Agrowon

‘नाशिक पशुसंवर्धन’ टॅगिंगमध्ये राज्यात तिसरा
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 नोव्हेंबर 2017

नाशिक : आधारकार्डच्या धर्तीवर दुधाळ जनावरांना कायमस्वरूपी क्रमांक देण्याच्या अर्थात टॅगिंग करण्याच्या कामात नाशिक जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ हजार ५६८ जनावरांना टॅगिंग झाले असून त्यांची माहितीही संगणकात भरण्यात आली आहे. 

नाशिक : आधारकार्डच्या धर्तीवर दुधाळ जनावरांना कायमस्वरूपी क्रमांक देण्याच्या अर्थात टॅगिंग करण्याच्या कामात नाशिक जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ हजार ५६८ जनावरांना टॅगिंग झाले असून त्यांची माहितीही संगणकात भरण्यात आली आहे. 

राज्यभरात २२ लाख दुधाळ जनावरांना टॅगिंग करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी अवघ्या २ लाख ५७,०५३ जनावरांना टॅगिंग होऊन त्यांची माहिती संगणकात भरण्यात आली आहे म्हणजे अवघे ११.६८ टक्के काम झाले आहे. दुधाचे उत्पादन वाढवणे, दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे या हेतूने गायी आणि म्हशींना क्रमांक देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. म्हणजे संबंधित गाय किंवा म्हशीला एकदा टॅगिंग केल्यानंतर संपूर्ण माहिती संगणकात भरली जाणार असून, संबंधित जनावराची विक्री झाल्यानंतरही नवीन ठिकाणी या जनावरासंदर्भात सर्वच माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. 

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत टॅगिंग करणे आणि संगणकात माहिती भरण्याचे काम सुरू आहे. राज्यात दुधाळ जनावरांची संख्या एकूण २२ लाख असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील १ लाख ७ हजार ३०० जनावरांचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाने यापैकी ३३ हजार ५६८ जनावरांना टॅगिंग करून माहिती संगणकात भरली आहे. देशात कुठेही या जनावरांची माहिती उपलब्ध होणार आहे. म्हणजे २८.६२ टक्के काम झाले असून, राज्यात हे काम तिसऱ्या क्रमांकाचे ठरले आहे.

हिंगोली जिल्ह्यात अवघी २८ हजार दुधाळ जनावरे असून, त्यापैकी ८ हजार ५८३ जनावरांना टॅगिंग झाले आहे. हे काम ३०.६५ टक्के झाले असून हा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर २९.५६ टक्के काम झालेला भंडारा जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात २३ हजार ९०० दुधाळ जनावरे असून, त्यापैकी ७ हजार ६५ जनावरांना टॅगिंग झाले आहे. या कामात सोलापूर जिल्हा पिछाडीवर आहे. १ लाख ६६ हजार २०० जनावरे असून, यापैकी अवघ्या ६ हजार २६३ जनावरांना टॅगिंग होऊन माहिती संगणकात भरण्यात आली आहे. हे काम अवघे ३.७७ टक्के इतके  आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...