नाशिक जिल्हा बँकेच्या तिजोरीत खडखडाट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती साजरी करत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील तब्बल २१ कोटी रुपये अजूनही धूळखात आहेत. दुसरीकडे पीक कर्जमाफीसाठी जे पात्र नाहीत, त्या शेतकऱ्यांनीही कर्ज फेडण्यास हात दाखविल्याने १५०० कोटी रुपये वसुली रखडली. यामुळे जिल्हा बँकेच्या तिजोरीत अजूनही खडखडाट कायम आहे.

वर्षभरापूर्वी नोटांबंदी केल्यानंतर अन्य बँकांना जुन्या नोटा बदलण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत परवानगी असताना जिल्हा बँकांना मात्र पहिल्या दोनच दिवसांत नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली.

दुसरीकडे बँकेने २०१६ मध्ये १७५० कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आहे. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्यास उदासीनता दाखविली असून सद्यस्थितीत १५०० कोटींची वसुली बाकी आहे. परिणामी जिल्हा बँकेत खडखडाट आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com