agriculture news in marathi, Nashik district, now a successful campaign for debt relief | Agrowon

नाशिक जिल्ह्यात कर्जवसुलीसाठी आता धडक मोहीम
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने बॅंकेतर्फे कर्जवसुली मोहीम पुन्हा जोमाने सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बॅंकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मैदानात उतरविण्यात आले असून, ते तालुक्‍यातील गावागावांत दौरे करत आहेत. बॅंकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर्जवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश बॅंकेचे अध्यक्ष केदार आहेर यांनी दिले आहेत.

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने बॅंकेतर्फे कर्जवसुली मोहीम पुन्हा जोमाने सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बॅंकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मैदानात उतरविण्यात आले असून, ते तालुक्‍यातील गावागावांत दौरे करत आहेत. बॅंकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर्जवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश बॅंकेचे अध्यक्ष केदार आहेर यांनी दिले आहेत.

जिल्हा बॅंक अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून आहेर यांनी कर्जवसुलीसाठी धडक मोहीम उघडली आहे. त्यानुसार आतापर्यंत जंगम आणि थकबाकी असलेल्या वाहनांच्या जप्तीद्वारे २ कोटी रकमेची वसुली केली. मात्र वसुलीची रक्कम २ हजार ७६९ कोटी रुपये आहे. त्यापैकी केवळ ६७४ कोटींची वसुली असून, ही थकबाकी पोटी अवघी १९ टक्के आहे. थकबाकी पोटी आतापर्यंत २६८ कोटी ६० लाखांचे व्याज जमा झाले आहे. परिणामी, अधिकाधिक कर्जवसुलीसाठी २१ जूनपासून परत कर्जवसुली मोहीम राबविली जाणार आहे.

बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांना प्राप्त १५६ अधिकारान्वये सहकार कायदा १९६० चे कलम १०७ नुसार जप्ती करून जिल्ह्यात आतापर्यंत ६०० ते ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती आदेश दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पुढील लिलाव प्रक्रियेसंदर्भात कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आलेले आहेत. उर्वरित तालुक्‍यातील ऐपतदार थकबाकीदारांवर जप्ती आदेश लवकरच प्रसिद्ध करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मैदानात उतरविले असल्याची माहिती अध्यक्ष आहेर यांनी दिली.

कर्जमाफीचा लाभ घ्या
सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २१ हजार ७०० पैकी केवळ ११ हजार खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. योजनेची अंतिम मुदत ३० जून २०१८ अखेरपर्यंतच असल्याने उर्वरित अधिकाधिक खातेदारांनी लाभ घ्यावा, असे आदेश अध्यक्ष आहेर यांनी दिले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...