agriculture news in marathi, nashik district receives 3 crore 75 lakhs for loanwaiver | Agrowon

नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीचे पावणेचार कोटी जमा
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नाशिक : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेंतर्गत अपडेट झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या ग्रीन याद्या ‘अापले सरकार’ या पाेर्टलवर अपलाेड झाल्या अाहेत. पहिल्या टप्प्यातील या कर्जमाफीकरिता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८७९ शेतकरी कर्जदारांची नावे या यादीत अाहेत.

नाशिक : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेंतर्गत अपडेट झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या ग्रीन याद्या ‘अापले सरकार’ या पाेर्टलवर अपलाेड झाल्या अाहेत. पहिल्या टप्प्यातील या कर्जमाफीकरिता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८७९ शेतकरी कर्जदारांची नावे या यादीत अाहेत.

या खात्यांच्या कर्जमाफीकरिता स्वतंत्र बँक खात्यावर ३ काेटी ७० लाख रुपये जमा झालेले असले तरी अाता तालुकास्तरावर गठित करण्यात अालेल्या समित्यांकडून त्या तालुक्यातील लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात येईल, त्यानंतरच या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ही रक्कम जमा हाेऊ शकणार अाहे. त्यासाठी अजून किमान अाठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण हाेणार अाहे.

राष्ट्रीयीकृत बँकांची मुख्यालये मुंबई, पुण्यात असल्याने जिल्हानिहाय किती शेतकरी पात्र अाहेत अाणि त्यांना दिली जाणारी कर्जमाफीची रक्कम किती, याची माहिती त्या कार्यालयांकडेच अाहे. त्यामुळे जिल्ह्यात नेमक्या किती शेतकऱ्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात झालेला अाहे, याची माहिती संबंधित यंत्रणांकडेही अद्याप नसल्याचे समाेर अाले अाहे. दुसरीकडे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ८७९ शेतकरी पहिल्या टप्प्यातील ग्रीन याद्यांवर नजर टाकता पात्र ठरलेले असले तरी अजून त्यांना तालुकास्तर समितीचा अडथळा पात्रतेसाठी पार करावा लागणार अाहे; तसेच चुकीचे लाभही काेणाच्या पदरात पडू देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात अाले अाहे. 

त्यानुसारच अाता अंतिम टप्पा म्हणून तहसीलदार, तालुका उपनिबंधक यांचा समावेश असलेल्या तालुकास्तर समितीच्या बैठकांतून याेजनेतील अपात्रतेचे निकष धारण करीत असलेल्या शेतकऱ्यांची नावे या यादीतून वगळली जातील अाणि पात्र लाभार्थ्यांची यादी नक्की केली जाईल. या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमाफीची अालेली रक्कम वळती केली जाईल. यानंतर या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी मिळू शकणार अाहे.

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...