नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते १०००० रुपये

नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते १०००० रुपये
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते १०००० रुपये

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात आले आवक ३९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८७०० ते १०००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी जास्त निघाले. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली. तसेच परपेठेत मागणी वाढल्या असल्याने बाजारभावात वाढ झाली. हिरव्या मिरचीची आवक ४०२८ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला ४००० ते ५००० तर ज्वाला मिरचीला ४५०० ते ५५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला.

मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. वालपापडी घेवड्याची आवक १०२३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ६८०० ते ७५०० दर मिळाला तर घेवड्याला ६७०० ते ७५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

गाजराची आवक ५६२९ क्विंटल झाली. त्यास २१०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक घटूनही गाजराचे भाव कमी झाल्याचे दिसून आले. भुईमुगाच्या शेंगांची आवक २२७८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते ३००० असा दर मिळाला.  उन्हाळ कांद्याची आवक १८२९४ क्विंटल झाली. बाजारभाव ५००  ते १५०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक ८५३८  क्विंटल झाली. बाजारभाव ६००  ते १२५०  प्रतिक्विंटल होते.

टोमॅटोला १०० ते ६११, वांगी २६० ते ४५०, फ्लॉवर ६० ते १६० असे प्रती १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ८० ते १५५ असा प्रती २० किलोस दर मिळाले. ढोबळी मिरची १९५ ते ३९५ प्रती ९ किलोस दर मिळाला. भोपळा ९० ते ३००, कारले ३८० ते ६००, गिलके २५० ते ३२५, भेंडी १२० ते ३२० असे प्रती १२ किलोस दर मिळाले तर काकडीला १९० ते ४५०, लिंबू  ३०० ते ८००, दोडका ५३० ते ८०० असे प्रती २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १६०० ते ७५००, मेथी १६०० ते ३५००, शेपू ७०० ते २४००, कांदापात १४०० ते ४०००, पालक २१० ते ४३०, पुदिना १९० ते ३९० असे प्रती १०० जुड्यांना दर मिळाले.  

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ५०९१ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ५०० ते ५००० व मृदुला वाणास ७०० ते ८५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. आंब्याची आवक २०४८ क्विंटल झाली. लालबाग २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल, तर केशर आंब्यास ४००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. टरबुजाची आवक १६१० क्विंटल झाली. खरबुजाची आवक १६१० क्विंटल झाली. बाजारभाव १५०० ते २००० प्रतिक्विंटल मिळाला. मोसंबीची आवक १२० क्विंटल झाली. बाजारभाव २५०० ते ५५०० प्रतिक्विंटल मिळाला. केळीची आवक ३९६ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com