agriculture news in marathi, Nashik has been increasing the prices of eggplant, ghee and ginger rates | Agrowon

नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीत
ज्ञानेश उगले
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटलेली होती. या स्थितीत भाज्यांना स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजार समितीतून मागणी वाढल्यामुळे तेजीचे दर मिळाले. यात वांगी, घेवडा, आले, कारले, भोपळा, घेवडा या भाज्यांना तेजीचे दर मिळाले.

नाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटलेली होती. या स्थितीत भाज्यांना स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजार समितीतून मागणी वाढल्यामुळे तेजीचे दर मिळाले. यात वांगी, घेवडा, आले, कारले, भोपळा, घेवडा या भाज्यांना तेजीचे दर मिळाले.

नाशिक भागात मागील पंधरवड्यापासून थंडीचा माहौल आहे. गत सप्ताहात तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. या काळात बहुतांश भाज्यांची आवक घटली. या काळात दरवर्षी वांग्याला मागणी वाढते. गत सप्ताहात वांग्याची १८२ क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटलला १७०० ते ३५०० व सरासरी २२५० रुपये दर मिळाले. वांग्याच्या तुलनेत घेवड्याची आवक अत्यल्प होती. या वेळी घेवड्याची आवक अवघी ३५ क्विंटल होती. तर, घेवड्याला प्रतिक्विंटलला ३५०० ते ५५०० व सरासरी ४००० रुपये दर मिळाले. 

आल्याची आवक ९० क्विंटल झाली. तर आल्याला प्रतिक्विंटलला ५००० ते ७००० व सरासरी ६००० रुपये दर मिळाले. या काळात लिंबाची आवक सर्वांत कमी झाली. लिंबाची आवक २० क्विंटल झाली असताना लिंबाला क्विंटलला ३००० ते ४००० व सरासरी ३५०० रुपये दर मिळाले. नाशिक भागातील कारल्याला मुंबईसह परराज्यांतील बाजारातून चांगली मागणी होत असल्याचे चित्र आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ या तालुक्‍यांतून कारल्याची आवक होते. गत सप्ताहात कारल्याची ३३८ क्विंटल आवक झाली. कारल्याला क्विंटलला २०१५ ते ३१२५ व सरासरी २६७० रुपये दर मिळाले. 

थंडीचा परिणाम पालेभाज्यांवरही झाला आहे. गत सप्ताहात पालेभाज्यांची आवक खूपच कमी राहिली. या काळात जिल्ह्याबाहेरील बाजारातून मागणी वाढल्यामुळे पालेभाज्यांना तेजीचे दर मिळाले. कोथिंबिरीची सरासरी आवक ४८ हजार जुड्यांची होती. कोथिंबिरीला प्रतिशेकडा १००० ते ४८०० व सरासरी ३००० रुपये दर मिळाले. त्यानंतर शेपूची आवक २३ हजार ७०० जुड्यांची होती. 

शेपूला प्रतिशेकडा १००० ते २१०० व सरासरी १५५० रुपये दर मिळाले. याचवेळी मेथीची सरासरी आवक २२ हजार जुड्यांची होती. मेथीला प्रति शंभर जुडीस ८०० ते १८०० व सरासरी १४०० रुपये दर मिळाले. फळभाज्या व पालेभाज्यांचे दर येत्या सप्ताहात टिकून राहतील असा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केला.
 

इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...
कोल्हापुरात टोमॅटोच्या दरात वाढकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात मेथी, शेपूचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...