नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी गाठली शंभरी

नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी गाठली शंभरी
नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी गाठली शंभरी

नाशिक : नैसर्गिक आपत्तींसह कर्ज, नापिकी अन्‌ मातीमोल बाजारभावासह विविध कारणांनी त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वर्षभरात केलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी शुक्रवारी शंभरी गाठली. मालेगाव तालुक्‍यातील अस्ताणेचे प्रल्हाद नथू अहिरे (६०) यांनी शुक्रवारी विषप्राशन करून आत्महत्या केली.

नाशिकसारख्या सुपीक मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ही आकडेवारी असल्याने कृषी क्षेत्राचे भयावह वास्तवच त्यानिमित्ताने सामोरे आले आहे. तलाठ्याने या आत्महत्येचा पंचनामा करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांसह जिल्हा प्रशासनाकडे शुक्रवारीच रवाना केला. संबंधित शेतकऱ्याच्या नावे सुमारे १.९३ हेक्‍टर शेती असून, त्यावर अस्ताणे विविध कार्यकारी सोसायटीचे लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करूनही तांत्रिक कारणास्तव ती कर्जमाफी संबंधित सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकलेली नाही. तसेच ही घोषणादेखील शेतकरी आत्महत्या रोखण्यात कुचकामी ठरत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यात मुख्यमंत्री उत्तर महाराष्ट्राचा दौरा करीत शुक्रवारी मध्यरात्री नाशिकला मुक्कामी आले असतानाच शेतकरी आत्महत्येची वार्तादेखील येऊन धडकली.

त्यामुळे या आत्महत्यांच्या प्रकरणात शासन, प्रशासन कितपत संवेदनशीलता दाखवते आणि कर्जमाफीच्या पुढील कार्यवाहीला कशाप्रकारे वेग देते त्याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

कर्जमाफीची प्रतीक्षा जीवघेणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर करून महिन्यांहून अधिक कालावधी उलटला. मात्र अद्यापही सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोचलेला नसल्याने ही प्रतीक्षादेखील जीवघेणी ठरत असल्याचेच चित्र आहे. गतवर्षभरात नाशिक जिल्ह्यातील ८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यात यंदा कर्जमाफीच्या घोषणेनंतरही वाढच झाल्याचे वास्तव दिसून येत आहे.

तालुकानिहाय आत्महत्या मालेगावमध्ये सर्वाधिक १६, तर बागलाणमध्ये १३, त्याशिवाय निफाडमध्ये १२, दिंडोरी ११, नांदगाव ११, चांदवड १०, कळवण ७, सिन्नर, येवला ६, नाशिक, त्र्यंबकेश्वर ३, देवळा आणि सुरगाण्यात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com