agriculture news in marathi, The Nashik Market Committee is included in the 'e-name' scheme | Agrowon

नाशिक बाजार समितीचा ‘ई-नाम’ योजनेत समावेश
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

नाशिक : केंद्र शासनातर्फे शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजना राज्यातील ६० बाजार समितीत राबविण्यात येत आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची या योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून, शेतकऱ्यांनी त्याअंतर्गत आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

नाशिक : केंद्र शासनातर्फे शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजना राज्यातील ६० बाजार समितीत राबविण्यात येत आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची या योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून, शेतकऱ्यांनी त्याअंतर्गत आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही. विक्री केलेल्या मालाची रक्कम मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार असल्याने शासनाने इलेक्ट्रॉनिक बाजार तयार करून इंटरनेटद्वारे बाजारपेठ निर्माण केली आहे. यामध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते, मोबाइल रजिस्टर आहेत. बाजार समितीत आलेल्या मालाची गेट इंट्री करून मालाची गुणवत्ता तपासणी व लॉट क्रिएशन होते. मालाची विक्री ई ओकशनद्वारे करून अहवाल जनरेट केले जातात. खरेदीदार व्यापारी पोर्टलद्वारे बिल देत असल्याने पूर्णपणे गोपनीयता राहते. स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण होत असल्याने मालाला चांगला बाजारभाव मिळतो. शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा होते.

केंद्र शासनाने विकसित केलेल्या ई-नाम पोर्टलद्वारे शेतमाल विक्री केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. शेतमालाचे योग्य वजन व चांगला बाजारभाव मिळून त्वरित पैसे मिळण्याची खात्री असल्याने शेतकऱ्यांनी मालाची विक्री ई-नामद्वारे करावी, असे आवाहन बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, उपसभापती युवराज कोठुळे यांनी केले आहे.

इतर बातम्या
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...