agriculture news in marathi, Nashik Onion, MLA Bacchu Kadu, Maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात कांदा परिषद घेणार : बच्चू कडू
ज्ञानेश उगले
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सुकाणू समितीची यासाठी येत्या २० ऑक्टोबरला बैठक होणार असून, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल.
- बच्चू कडू, आमदार

 

नाशिक : देशातून कांदा निर्यात होणे गरजेचे असताना इजिप्तमधून कांदा आयात केला जातो. साखरेच्या निर्यातीला सबसिडी आहे ती कांदा उत्पादकांनाही दिली पाहिजे. कांदा उत्पादकांच्या हक्कासाठी येत्या १५ दिवसांत जिल्ह्यात ‘कांदा परिषद’ घेतली जाईल, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.

नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी (ता. २७) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की ऑगस्ट महिन्यात कांद्याचे दर वाढले आणि सप्टेंबरमध्ये व्यापारीवर्गावर प्राप्तिकर खात्याने धाडी घातल्या. केंद्र सरकारने या धाडी जाणीवपूर्वक घातल्या असून, हे सरकार दरोडेखोरांचे आहे. कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. मात्र, त्याला आधारभूत किंमत मिळत नाही. त्यामुळे कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून वगळण्यात यावा किंवा त्याला आधारभूत किंमत द्यावी. कांदा भाव वाढल्यास सरकारला चिंता वाटत असेल तर स्वस्त धान्य दुकानातून कांदा विक्री करावा. 

शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज ही भाजप सरकारची चाणक्यनीती आहे. शेतकऱ्यांची पडताळणी करण्यासाठी सरकारकडे ग्रामसेवक, कृषिसेवक आहेत. आधारकार्डशी जोडणी केल्यामुळे शेतकऱ्यांची संख्या कमी झाली, असा दावा आता केला जात आहे. मात्र, सुकाणू समितीची यासाठी येत्या २० ऑक्टोबरला बैठक होणार असून, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे कडू म्हणाले. 

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळावा यासाठी आंदोलन केले होते. मात्र, आता त्यांना कापूसदराचा विसर पडला आहे. ऊसदरासाठी ज्याप्रमाणे रंगनाथन समितीचे ७०ः३० चे सूत्र आहे त्याप्रमाणे कापूस उत्पादकांनाही मोबदला मिळणे गरजेचे आहे. कापडाची कधीही निर्यातबंदी केली जात नाही; मात्र कापसावर निर्यातबंदी लादली जाते. तूर, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी परिषद घेतल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे कडू म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...