नाशिकला कांदा १२०० ते ३२५१ रुपये

नाशिकला कांदा १२०० ते ३२५१ रुपये
नाशिकला कांदा १२०० ते ३२५१ रुपये

नाशिक : लासलगाव बाजार समितीत गुरुवारी (ता.२) कांद्याला प्रतिक्विंटलला १२०० ते ३१५१ व सरासरी २९५१ असे दर मिळाले. नाशिक जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यांत दराची हीच स्थिती होती. केंद्र शासनाने बाजारात कोणतीही भीती न घातल्यास हे दर येत्या काळात टिकून राहतील, असे जाणकारांनी सांगितले. दीपोत्सवानंतर कांद्याने उसळी घेतली असून, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२) उन्हाळ कांद्याला ३२५१ रुपये; तर नव्याने दाखल होत असलेल्या लाल कांद्याला ३०५३ रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. लाल कांदा दरात पंधराशे, तर उन्हाळ कांदा दरात सातशे रुपयांची प्रतिक्विंटलमागे भाववाढ झाली. गेल्या सोमवारी कांद्याला २५५१ इतका भाव मिळाला होता. त्यानंतर सोमवारी (ता.२९) उन्हाळ कांद्याला किमान १२००, कमाल ३२५१, तर सरासरी २९५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याने दोन वर्षांनंतर तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.  लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला ३२५१; तर लाल कांद्याला ३०५३ रुपये असा भाव मिळाला. आता केंद्र सरकारने कोणताही निर्णय घाईत घेऊ नये. येणाऱ्या दिवसांत लाल कांद्याची मोठी आवक होऊन भाव स्थिर होतील. - जयदत्त होळकर, सभापती,  लासलगाव बाजार समिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com