नाशिकमध्ये डाळिंबाची आवक कमी, बाजारभावही स्थिर

डाळिंबाची आवक कमी, बाजारभावही स्थिर
डाळिंबाची आवक कमी, बाजारभावही स्थिर

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक कमी झाली असून परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभावसुद्धा स्थिर होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ६४६२ क्विंटल झाली. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४०० ते २८७५ व मृदुला वाणास ५०० ते ५५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. चालू सप्ताहात मिरचीची आवक ७७८ क्विंटल झाली. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ४५०० ते ६००० दर मिळाला. तर ज्वाला मिरचीला ४००० ते ५५०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

वालपापडीची आवक २३९९ क्विंटल होती. आवक कमी झाल्याने व परपेठेत मागणी असल्याने बाजारभावात वाढ झाली. वालपापडीला ३५०० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. घेवड्याला ५००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सप्ताहात गाजराची आवक ३१६९ क्विंटल झाली. त्यास  १२०० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला.

फळांमध्ये खरबूजाची आवक ४२५ क्विंटल झाली. भाव १००० ते २२०० प्रतिक्विंटल मिळाला. टरबुजाची आवक ३८२० क्विंटल झाली. बाजारभाव ५५० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला. पपईची आवक १० क्विंटल झाली. तिला ७०० ते १२०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

मोसंबीची आवक ४४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० दर मिळाला. संत्रीची आवक ६० क्विंटल झाली. तिला १८०० ते ३८०० प्रतिक्विंटल दर मिळाला. केळीची आवक २४० क्विंटल झाली. तिला ५०० ते ११५० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

चालू सप्ताहात काही फळभाज्यांची आवक थोडी कमी तर काहींची जास्त झाल्याने बाजारभाव देखील कमी जास्त निघाले. टोमॅटोला १०० ते २१०,  वांगी १०० ते ३००,  फ्लॉवर १०० ते २०० असे प्रती १४ किलोस दर मिळाले. कोबीला ८०  ते १८० असा प्रती २० किलोस दर मिळाला. 

ढोबळी मिरची १७० ते ३७५  प्रती ९ किलोस दर मिळाला. भोपळा ५० ते २६०, कारले ४५० ते ७५०, गिलके  १५० ते २६०, भेंडी  ३००   ते  ५०० असे प्रती १२ किलोस दर मिळाले. तर काकडीला  २५०  ते ५००,  लिंबू  ७००   ते  ९००, दोडका ५०० ते ७७५  असे प्रती २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १७०० ते ६५००,  मेथी ८०० ते २४००,  शेपू ८५० ते २०००, कांदापात १००० ते ३६००,  पालक २०० ते ३००, पुदिना १०० ते १५० असे दर प्रती १०० जुड्यांना मिळाले. उन्हाळ कांद्याची आवक १७१५७  क्विंटल झाली. बाजारभाव १६१ ते ८२५ प्रतिक्विंटल होते. बटाट्याची आवक  १११३६ क्विंटल झाली. 

बाजारभाव ६५० ते १४०० प्रतिक्विंटल होते. लसणाची आवक ६६० क्विंटल झाली. त्याला १८०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. आद्रकची आवक ३८९ क्विंटल झाली. त्यास ६५०० ते ७५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील सप्ताहासारखी आवकेच्या तुलनेत आवकेमध्ये चढ उतार असून दरातही चढ उतार सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com