agriculture news in marathi, Nationalist congress party to agitate on farmers issue | Agrowon

राष्ट्रवादीचा आज हल्लाबोल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : येथे शनिवारी (ता.३) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यात आयोजित हल्लाबोल यात्रेचा समारोप केला जाणार आहे. यानिमित्ताने रॅली काढण्यात येणार असून, त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप सभा होणार आहे.  

औरंगाबाद : येथे शनिवारी (ता.३) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यात आयोजित हल्लाबोल यात्रेचा समारोप केला जाणार आहे. यानिमित्ताने रॅली काढण्यात येणार असून, त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप सभा होणार आहे.  

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून १६ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल यात्रेला सुरवात करण्यात आली होती. या हल्लाबोल यात्रेचा मराठवाड्यातील पहिला टप्पा २४ जानेवारी रोजी बदनापूर येथील सभेने संपला. ९ दिवसांत मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांतील २६ तालुक्‍यांतील २६ मतदारसंघांतून जवळपास दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी २६ सभा, मोर्चे, पदयात्रा, मोटारसायकल रॅली, बैठका आदींच्या माध्यमातून मराठवाड्यातील जनतेशी संवाद साधला. 

हल्लाबोल यात्रेचा समारोप ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत रॅली आणि त्यानंतर होणाऱ्या जाहीर सभेने होणार आहे. दुपारी १ वाजता क्रांती चौकातून या रॅलीला सुरवात होणार आहे. दुपारी तीन वाजता ही रॅली विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. निवेदन दिल्यानंतर हल्लाबोल यात्रेची समारोपीय सभा होईल. या सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. 

सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस
उत्पादकांना हेक्‍टरी ५० हजारांची मदत, वाढती बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका आदी प्रश्‍नांवर या सभेत सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. कार्यकर्ते व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...