राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काेण? आज निर्णय
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काेण? आज निर्णय

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काेण? आज निर्णय

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काेणाची वर्णी लागणार यावर आज (रविवारी, ता. २९) शिक्कामाेर्तब हाेणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा असून, पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपला राेखण्यासाठी जयंत पाटील यांच्या नावावर माेहाेर उमटण्याची शक्यता अधिक आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची कार्यकारिणी बैठक आणि सर्वसाधारण सभा दुपारी १ वाजता मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात हाेणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा ९ वर्षांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वसाधारण सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील असणार असून, बैठकीला विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यासह सर्व माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या सभेमध्ये पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शरद पवार विद्यमान राजकीय घडामाेडींवर भाष्य करणार आहेत. तसेच आगामी लाेकसभा व विधानसभा निवडणुकांसाठीचे मार्गदर्शनदेखील करणार आहेत, अशी माहिती प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबराेबरच विविध जिल्हा, तालुका आणि शहराध्यक्ष यांच्याबराेबरच विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यादेखील जाहीर करण्यात येणार आहेत. प्रभाकर देशमुख यांच्यावर विशेष जबाबदारी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यावर सातारा जिल्ह्याची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. देशमुख हे शरद पवार यांच्या अतिशय जवळचे समजले जातात. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी विशेष काैतुक करत राजकीय वाटचालीची दिशा दिली हाेती. या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्यावर विशेष जबाबदारी देण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गाेटातून व्यक्त हाेत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com