agriculture news in marathi, Nationalist Congress party to take aggressive stand against Government | Agrowon

शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक होणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांबद्दलचे सरकारविरोधी धोरण, अधिवेशनातील राज्य सरकारची निष्क्रियता आणि शेतीसह इतर प्रश्नांवर आगामी काळात आणखी आक्रमक होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत मंगळवारी (ता. १९) हा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांबद्दलचे सरकारविरोधी धोरण, अधिवेशनातील राज्य सरकारची निष्क्रियता आणि शेतीसह इतर प्रश्नांवर आगामी काळात आणखी आक्रमक होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत मंगळवारी (ता. १९) हा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले, बोंडअळीने नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत करावी, असा राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तुडतुड्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतून मदत करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. पण सरकार शेतकऱ्यांसाठी काही करताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अधिक आक्रमक होऊन सरकारला जाब विचारावा लागेल. अधिवेशनामध्ये राज्यातील सर्वच विभागांना न्याय मिळालेला नाही, त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवून मागणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले.

तसेच विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाने जसा सरकारवर हल्लाबोल केला तसाच भविष्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधी हल्लाबोल करण्याची तयारी पक्षाने करावी, असेही त्यांनी सांगितले.

तटकरे पुढे म्हणाले, संघटनात्मक बाबींचाही या बैठकीमध्ये विचार झाला, शिवाय गुजरातच्या निकालाने देशातील राजकीय ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेला वेग येऊ शकतो. त्यादृष्टीने संघटनेचा पायाभूत विस्तार अधिक मजबूत करावा, अशा वेगवेगळ्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. गुजरातच्या निकालाने भारतीय राजकारणात बदल होऊ शकतो. २०१९ ला देशातील जनता पर्यायी विचार करू शकते, गुजरातच्या निकालाने असा संदेश भारतीय राजकारणाला दिला आहे.

भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. काँग्रेसने या कामात पुढाकार घ्यावा हे अत्यंत आवश्यक आहे, असेही तटकरे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा धसका सरकारने घेतला हे आपल्या आंदोलनाचे यश आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी सुनील तटकरे यांच्या हस्ते अजित पवार यांच्यावर काढण्यात आलेल्या ‘संघर्ष यात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाची संकल्पना आमदार वैभवराव पिचड आणि आमदार निरंजन डावखरे यांची आहे. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, हेंमत टकले यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे...मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश...
कृषिपंपांना भारनियमनाची समस्याजळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा...
शेतीच्या प्रश्‍नांबाबत...जळगाव : कर्जमाफीचा घोळ, पीककर्ज वितरणाची...
पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती....
सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा...आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते....
तंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने...कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील...
पाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या...कठोरा (ता. जि. जळगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी...
भविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदलअकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...