agriculture news in marathi, Nationalized banks' apathy in debt | Agrowon

कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची उदासीनता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 जुलै 2018
सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आघाडी घेतली आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये त्याबाबत उदासीनता आहे. बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, एसबीआय या नामांकित बॅंका वगळता उर्वरित राष्ट्रीयीकृत बॅंकांची कर्जवाटपाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही.
 
सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आघाडी घेतली आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये त्याबाबत उदासीनता आहे. बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, एसबीआय या नामांकित बॅंका वगळता उर्वरित राष्ट्रीयीकृत बॅंकांची कर्जवाटपाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही.
 
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वारंवार याबाबत सूचना देऊनही बॅंकांना फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे या बॅंकांवर आता कारवाई होण्याची गरज आहे. कर्जवाटपामध्ये प्रामुख्याने आंध्रा बॅंक, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल  बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, इंडस्टलंड बॅंक, कोटक महिंद्रा या बॅंका पिछाडीवर आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांना खरिपासाठी ६५ हजार ७८६ खातेधारकांना ८८६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १९ हजार ६४० शेतकऱ्यांना ३४० कोटी रुपयांचे कर्जवाटप आतापर्यंत झाले आहे.
जिल्ह्यातील १० खासगी बॅंकांना १० हजार १५७ शेतकऱ्यांना १५५ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यांनी आतापर्यंत ८ हजार ६३९ शेतकऱ्यांना १२१ कोटी रुपयांचे वाटप केले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ६७ हजार ६३१ शेतकऱ्यांपैकी २२ हजार ६१२ शेतकऱ्यांना १६६ कोटी रुपयांचे वाटप केले. जिल्हा बॅंकेतर्फे त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. राष्ट्रीयकृत बॅंकांनी मात्र शासनाच्या कर्जवाटपाबाबतच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...