agriculture news in marathi, Nationalized banks lends 451 crore crop loan after action | Agrowon

दणक्यानंतर बॅंका आल्या ताळ्यावर; ४५१ कोटींचे पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

यवतमाळ : मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तब्बल ४५१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या धडक कारवाईनंतर राष्ट्रीयीकृत बॅंका ताळ्यावर आल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची गती वाढली आहे.

यवतमाळ : मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तब्बल ४५१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या धडक कारवाईनंतर राष्ट्रीयीकृत बॅंका ताळ्यावर आल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची गती वाढली आहे.

पेरणी सुरू झाल्यानंतरही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्ज वाटपात आखडता हात घेतला होता. सूचना देऊनही कर्जवाटपाची टक्केवारी वाढली नाही. परिणामी, शेतकऱ्यांची अडवणूक सुरू होती. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईनंतर राष्ट्रीयीकृत बॅंकांना जाग आली. मागील आठ दिवसांत बॅंकांनी तब्बल ४५१ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. यापूर्वी कर्ज वाटपाचा आकडा ३७७ कोटी रुपयांवर स्थिरावला होता. त्यानंतर कारवाईमुळे सोमवारी (ता.१८) बॅंकेव्दारा २१ कोटी तर मंगळवारी (ता.१९) बॅंकांनी २२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. विशेष म्हणजे भारतीय स्टेट बॅंकेचे (एसबीआय) शासकीय खाते बंद केले असले तरी इतर बॅंकांनी धडा घेत कर्जवाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन हाती घेतले.

शेतकरीहित लक्षात घेता जिल्हाधिकारी देशमुख यांनी एसबीआयवर केलेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना कर्जवाटपात गती आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते नीमिष मानकर, पालिकेतील गटनेते पंकज मुंदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर, चिकणीचे सरपंच नीलेश राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. 
तत्पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव, प्रगतिशील शेतकरी अमृत देशमुख, बाबासाहेब पाटे यांच्यासह महागाव व उमरखेड येथील शेतकऱ्यांनीही जिल्हाधिकारी देशमुख यांचे स्वागत केले.

विखे पाटील यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक
यवतमाळ आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. जिल्ह्यात एसबीआयला ५७१ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी दहा टक्केही कर्जवाटप झाले नव्हते. एसबीआयने अशी कर्जवाटपाबाबत केलेली हलगर्जी अक्षम्य आहे. हा प्रकार शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासारखा आहे. त्यामुळे दोषी असलेल्या एसबीआयच्या अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी करून विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करीत त्यांचे कौतुकही केले.
 

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...