agriculture news in marathi, NCP's movement demanded to declare drought | Agrowon

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

सोलापूर : शेतीपंपांचे भारनियमन कमी करावे, सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १२) आंदोलन करण्यात आले. जुनी मिल कंपाउंड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

सोलापूर : शेतीपंपांचे भारनियमन कमी करावे, सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १२) आंदोलन करण्यात आले. जुनी मिल कंपाउंड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, बोअरमध्ये पाणीपातळी कमी झाली आहे. जे पाणी आहे तेसुद्धा उपसा करण्यासाठी पाहिजे, तेवढी वीज मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील रोहित्रे सातत्याने बिघडत असतानासुद्धा महावितरणचे अधिकारी, कर्मचारी त्याकडे लक्ष देत नाहीत. त्याची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने आणि जळालेले रोहित्र वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था ‘दुष्काळात तेरावा महिना` अशी झाली आहे. एकूणच शेतकऱ्यांना कोणीच वाली राहिलेला नाही. खऱ्या अर्थाने जेवढा वीजपुरवठा होत आहे, तो सुद्धा सातत्याने खंडित करण्यात येत आहे. सरकारी धोरणांचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे, याला भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोप जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांनी या वेळी बोलताना केला.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ भारनियमन कमी करून बळिराजाला दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, पुतळा दहन आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली. पावसाअभावी पेरणी केलेली पिकेसुद्धा वाया गेली आहेत. पाऊस नसल्याने जनावरांना चारा नाही. पाण्याचीसुद्धा कमतरता भासत आहे. शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हुमणी अळीचा मोठा फटका बसला आहे. हुमणीबाधित क्षेत्राचे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

इतर बातम्या
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
खरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...