agriculture news in marathi, NCP's movement demanded to declare drought | Agrowon

निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी तयार केली. हा ‘इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड’ झाला अाहे. हिरव्या, पांढऱ्या, काळ्या व केशरी रंगातील जर्सी परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पाच मिनिटे मौन धारण करून मान झुकवून निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी साकारण्यात अाली.

बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी तयार केली. हा ‘इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड’ झाला अाहे. हिरव्या, पांढऱ्या, काळ्या व केशरी रंगातील जर्सी परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पाच मिनिटे मौन धारण करून मान झुकवून निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी साकारण्यात अाली.

निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डचे मनोहर तत्ववादी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेतील ‘निवडणूक व मतदार जागृती` या विषयावरील उत्कृष्ट चित्रांचे मान्यवरांनी अवलोकन केले. विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाप्रमाणे साकारली.

या रांगोळीची दखल इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने घेतली. त्यांनी रांगोळीचे व्हिडिओ चित्रीकरण केले. ही मानवी रांगोळी पाच मिनिटे ठेवून त्यांनी या उपक्रमाची नोंद केली. त्यानंतर निवडणूक आयागेाला त्याबाबतचे प्रमाणपत्र, इंडियाज् वर्ल्ड रेकॉर्डचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. या वेळी मतदार जागृती मोहीम, विशेष संक्षीप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम, उपक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, महिला बचत गट, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, पतसंस्था चालक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...