agriculture news in Marathi, NDRF team will instigate cotton issue, Maharashtra | Agrowon

केंद्राचे पथक करणार कपाशीची पाहणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नागपूर ः राज्य सरकारकडून बोंड अळी संदर्भाने मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर येत्या आठवड्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण (एनडीआरएफ)चे पथक विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. एक फेब्रुवारीपासून हे पथक दौऱ्यावर येण्याची शक्‍यता असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

नागपूर ः राज्य सरकारकडून बोंड अळी संदर्भाने मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर येत्या आठवड्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण (एनडीआरएफ)चे पथक विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. एक फेब्रुवारीपासून हे पथक दौऱ्यावर येण्याची शक्‍यता असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्य सरकारने बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ३० हजार रुपये, तर बागायती शेतकऱ्यांकरिता ३७ हजार रुपये प्रतिहेक्‍टर याप्रमाणे मदत दिली जाईल. त्यामध्ये प्रतिहेक्‍टर १६ हजार रुपये बियाणे कंपन्यांकडून घेतले जाणार आहेत. त्याला बियाणे कंपन्यांनी आधीच नकार दिला आहे.

प्रतिहेक्‍टर ८ हजार रुपये विमा भरपाई, तर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून ६ हजार ८०० रुपये दिले जातील. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाला त्या संदर्भाने अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. त्यानुसार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पथक लवकरच विदर्भाच्या दौऱ्यावर येत असल्याचे सांगण्यात आले.

एक फेब्रुवारीला हे पथक नागपूरला पोचेल. त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती व अकोला जिल्ह्यांत पथकाद्वारे नुकसानग्रस्त भागातील काही शेतांची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी होईल. त्याआधारे केंद्र सरकार मदतीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...