agriculture news in marathi, Need for 2.25 crore for 'Okhi' damages | Agrowon

'ओखी' नुकसानग्रस्तांसाठी सव्वादोन कोटींची गरज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नाशिक  : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाई पोटी दोन कोटी ३३ लाख रुपयांची गरज असून, कृषी विभागाने पीक पंचनामे पूर्ण करून दिलेल्या अहवालाच्या आधारे शासनाकडे रकमेची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

नाशिक  : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाई पोटी दोन कोटी ३३ लाख रुपयांची गरज असून, कृषी विभागाने पीक पंचनामे पूर्ण करून दिलेल्या अहवालाच्या आधारे शासनाकडे रकमेची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रालाही धडक दिल्यामुळे त्याचे परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांत झाले. नाशिक जिल्ह्यात ४ ते ६ डिसेंबर या काळात ढगाळ हवामान व कडाक्याच्या थंडीचे वारे वाहून काही ठिकाणी पावसाने झोडपूनही काढले. या पावसामुळे साधारणत: द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक द्राक्षबागांमध्ये पावसाचे पाणी साचले, तर काही ठिकाणी घडे जमिनीवर पडले. कडाक्याच्या थंडीने द्राक्ष मण्यांना तडे जाण्याचे प्रकारही घडले.

याशिवाय खळ्यात काढून ठेवलेला कांदा व मक्याचे पीक भिजले, काही ठिकाणी गहू जमीनदोस्त झाला. नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना, शासनाने आठ दिवस उशिराने पीक पंचनाम्याचे आदेश दिले, परिणामी शेतकऱ्यांनी शेतात झालेल्या नुकसानीची सारवासारवी करून घेतली. त्यामुळे पीक पंचनामे करताना मोठी अडचण निर्माण झाली.

या संदर्भात शासनाकडे तक्रारी करण्यात आल्याने, शासकीय यंत्रणा पीक पंचनामे करतेवेळी संबंधित शेतकऱ्यांनी शेतात हजर राहावे, अशा सूचनाही केल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील १७० गावांना ओखी वादळाचा फटका बसून, १५०६ शेतकऱ्यांच्या ताब्यातील १२९५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले.

शासनाने ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बागायत पिकांखालील क्षेत्रासाठी दोन हेक्टरपर्यंत १३,५०० रुपये, तर फळपिकाखालील क्षेत्रासाठी १८,००० रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. त्यानुसार जिह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी दोन कोटी ३३ लाख ८,२९० रुपयांची गरज आहे. कृषी खात्याने अंतिम पंचनामे करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

इतर बातम्या
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत...औरंगाबाद, जालना ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार...वांगी, जि. सांगली ः दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...