परभणीत खरिपासाठी ९७ हजार क्विंटल बियाण्यांची गरज

परभणीत खरिपासाठी ९७ हजार क्विंटल बियाण्यांची गरज
परभणीत खरिपासाठी ९७ हजार क्विंटल बियाण्यांची गरज

परभणी ः परभणी जिल्ह्यात २०१९-२० च्या खरीप हंगामामध्ये ५ लाख ६३ हजार ८१८ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी सार्वजनिक आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे एकूण ९७ हजार ३६ बियाण्यांची गरज आहे. या संदर्भात जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी माहिती दिली.

येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख ६३ हजार ८१८ हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे, खते आदी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत जिल्ह्यात सरासरी ४० हजार ७१ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. यंदा खरिपात ५ लाख ६३ हजार ८१८ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये ज्वारी १० हजार हेक्टर बाजरी १ हजार हेक्टर, भात १० हेक्टर, मका १ हजार हेक्टर, तूर ४९ हजार हेक्टर, मूग १८ हजार हेक्टर, उडीद ९ हजार हेक्टर, भूईमूग ५० हेक्टर, तीळ ५०० हेक्टर, सूर्यफूल ५०० हेक्टर, सोयाबीन २ हजार ४९ हजार हेक्टर, कापूस १ लाख ९५ हजार हेक्टर, अन्य पिकांची २ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. 

प्रस्तावित बियाणे बदल दरानुसार सार्वजनिक बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ५५ हजार २३८ क्विंटल आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ४१ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. ज्वारीच्या ७५० क्विंटल, बाजरीच्या १५ क्विंटल, भाताच्या ३ क्विंटल, मकाच्या १५० क्विंटल, तुरीच्या ४ हजार ४१० क्विंटल, मुगाच्या १२०० क्विंटल, उडिदाच्या ६०० क्विंटल, भूईमुगाच्या ३ क्विंटल, तिळाच्या ९ क्विंटल, सूर्यफुलाच्या १५ क्विंटल, सोयाबीनच्या ८५ हजार क्विंटल, कपाशीच्या ४ हजार ८७५ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

महाबीजकडे ५५ हजार २३८ क्विंटल बियाण्यांची मागणी... महाबीजकडे सोयाबीनच्या जेएस ३३५ वाणाचे १० क्विंटल, एमएयूएस ७१ वाणाचे ३ हजार २८० क्विंटल, एमएयूएस १५८ वाणाचे १ हजार ४०० क्विंटल, डीएस २२८ वाणाचे ५० क्विंटल, एमएसीएस एच १२ वाणाचे ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. तुरीच्या आयसीपीएल ८७११९ वाणाचे १५ क्विंटल, बीएसएमआर ७३६ वाणाचे १९० क्विंटल, बीएसएमआर ८५३ वाणाचे ५ क्विंटल, बीडीएन ७१६ वाणाचे ५० क्विंटल, विपुला वाणाचे २५ क्विंटल, बीडीएन ७११ वाणाचे ११० क्विंटल बीडीएन ६०८ वाणाचे ६० क्विंटल, मुगाच्या कोपरगाव वाणाचे १० क्विंटल, बीएम २००२-१ वाणाचे २० क्विंटल, उत्कर्षा वाणाचे ९५ क्विंटल, बीएम २००३-२ वाणाचे ८५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com