Agriculture News in Marathi, need to change polices in agriculture, said former union agriculture minister sharad pawar, Sangli district | Agrowon

अर्थव्यवस्थेत सुधारणेसाठी शेतीबाबतची धोरणे बदला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017
कुंडल, जि. सांगली : देशाची अर्थव्यवस्था काळजी करण्यासारखी आहे. ती सुधारण्यासाठी सरकारने शेतीबाबतची धोरणे बदलली पाहिजेत. शेतकऱ्याच्या घामाला चांगली किंमत देण्यासाठी शेतीमालाला भाव देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतीतील भांडवली गुंतवणूक वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी (ता. २) कुंडल येथे केले.
 
कुंडल, जि. सांगली : देशाची अर्थव्यवस्था काळजी करण्यासारखी आहे. ती सुधारण्यासाठी सरकारने शेतीबाबतची धोरणे बदलली पाहिजेत. शेतकऱ्याच्या घामाला चांगली किंमत देण्यासाठी शेतीमालाला भाव देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतीतील भांडवली गुंतवणूक वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी (ता. २) कुंडल येथे केले.
 
क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांच्या अभीष्टचिंतन कार्यकर्तृत्व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी शरद पवार यांच्या हस्ते ‘ध्यास पर्व क्रांती विचारांचे वृत’ आणि ‘महाराष्ट्रचे शिल्पकार जी. डी. बापू लाड’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले.
 
या वेळी आमदार जयंतराव पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार शशिकांत शिंदे, सरपंच प्रमिला पुजारी सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, प्रमिला लाड, धनश्री लाड यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
श्री. पवार म्हणाले, की दहा वर्षे शासनाच्या साखर धोरण ठरवण्याचे काम केले आहे. यामध्ये राज्यातील साखर कारखान्याकडे लक्ष होते. यात ऊस नियोजन, उत्पादन, व्यवस्थापन क्राती कारखाना अग्रेसर ठरला आहे. आज शेतीची काळजी करण्याची आहे. जोपर्यंत राजकर्ते मोकळ्या हाताने देत नाहीत तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडणार नाही.
 
नोटाबंदीमुळे मंदीचे सावट संबध महाराष्ट्र भर निर्माण झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खाद्य तेलाची आपल्याकडे कमतरता आहे. आपण खाद्य तेल हे ब्राझील, अमेरिका, चीन अशा ठिकाणांहून आयात करतो आणि आम्ही सांगतो की आमचा देश कृषी प्रधान देश आहे. म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याची गरज आहे.
 
कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड म्हणाले, की कारखान्याची गुणवत्ता वाढवली आहे. कारखान्याने सरासरी उत्पादकता वाढवली पाहिजे. या वेळी जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आण्णासाहेब डांगे यांची भाषणे झाली. स्वागत शरद लाड यांनी केले. 

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...