agriculture news in marathi, Need of heavy rains for increase Dam water | Agrowon

धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 जुलै 2018

पाऊस बरा असून, पीकस्थितीही चांगली आहे. परंतु कीड व रोगाचे वातावरण तयार होत असल्याने फवारण्या घेतल्या जात आहेत. जोरदार असा पाऊस झालेला नाही.
- विशाल महाजन, शेतकरी, नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)

 जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी मध्यम व जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. परंतु, पूर्व भागातील रावेर, मुक्ताईनगर, यावल येथे मात्र भुरभुर पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरण कायम असून, कीड, रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी कामाला लागले आहेत.
हतनूरचे चार दरवाजे उघडे
तापी नदीवरील मुक्ताईनगरनजीकच्या हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडे केले आहेत. त्यातून ३६७२ क्‍सुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर उजव्या कालव्यातूनही ४०० क्‍सुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रावेरमधील अभोरा, सुकी, मंगरूळ प्रकल्पातील जलसाठा वाढलेला नाही.
 
गिरणा धरणाचा साठा मागील १० - १२ दिवसांत सहा टक्‍क्‍यांनी वाढून तो १६ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. तर वाघूर धरणाचा साठा दीड टक्‍क्‍यानी वाढून तो ३४.९७ टक्के एवढा झाला आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या मन्याड, भोकरबारी, अग्नावती, बहुळा, मन्याड, अंजनी या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे.
 
 तालुकानिहाय पाऊस
शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंतचा जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः
 जळगाव १४, यावल ६, रावेर ७, भुसावळ ९, बोदवड ५, मुक्ताईनगर ८, पाचोरा १३, चाळीसग १४, भडगाव ११, अमळनेर ११, पारोळा ९, धरणगाव ९, एरंडोल १२, जामनेर ११, चोपडा ८, सरासरी ४० टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...