पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन खतांची आवश्यकता

खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन खतांची आवश्यकता
खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन खतांची आवश्यकता

पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे एक लाख ८५ हजार १५८ टन खताची मागणी नोंदविली आहे. तसेच, गेल्या वर्षीचे २१ हजार ४४० टन खते शिल्लक आहेत. चालू वर्षाच्या मागणी केलेल्या खतास मंजुरी मिळाल्यास मोठ्या प्रमाणात खते उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख ८८ हजार २३७ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख ८७ हजार ३०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये भाताच्या व सोयाबीनच्या क्षेत्राची वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे कृषी विभागानेही खताच्या अडचणी येऊ नये म्हणून नियोजन केले आहे. लवकरच कृषी आयुक्तालयाकडून या खतास मंजुरी मिळणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांना या खताचा पुरवठा होणार आहे. 

यंदा सरळ खतामध्ये युरिया, अमोनियम, एमओपी आणि एस.एस.पी अशा खतांचा समावेश होत असून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. सुमारे एक लाख ६ हजार ३६४ टन खते उपलब्ध होणार आहे. संयुक्त खतांमध्ये ७८ हजार ७९४ टन खते उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे एक लाख ७९ हजार ७१८ टन खताची मागणी नोंदविली आहे. त्यापैकी कृषी विभागाने एक लाख ६८ हजार ७३० टन खताचे आवंटन मंजूर केले होते. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्यास ही खते शिल्लक राहिल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीचे २१ हजार ४४० टन खते शिल्लक  गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात एक लाख ७२ हजार ६३३ टन खताचा पुरवठा झाला होता. त्यापैकी २१ हजार ४४० टन खते शिल्लक आहेत. यामध्ये सरळ खतांचा ९ हजार ५८१ टन खतांचा समावेश आहे. यामध्ये युरिया ६,६७०, एमओपी १९४०, एसएसपी ९७० टन खताचा समावेश आहे. संयुक्त खताचा ११ हजार ८५८ टन खतांचा समावेश आहे.

खरीप हंगामासाठी मंजूर झालेले खते ः 
खत प्रकार  मंजूर खते 
युरिया ७६,७४०८ 
एमओपी  १२०४६ 
एसएसपी  १७,५७० 
१८ः४६ः००  २०,३४० 
१५ः१५ः१५  १२,०४६ 
१६ः१६ः१६  १२०० 
२०ः२०ः२०  २७६८ 
१९ः१९ः१९  ११५६ 
१०ः२६ः२६  २१९२० 
२४ः२४ः००  ११,२३४ 
१२ः३२ः१६  ७३९६ 
१४ः३५ः१४  ७२६ 
एकूण  १,८५,१५८ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com