कीटकनाशकांना ‘कलर कोडिंग’ची गरज

कीटकनाशकांना ‘कलर कोडिंग’ची गरज

मुंबई : राज्यात पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांना ‘कलर कोडिंग’ करण्याची आवश्‍यकता व्यक्‍त केली आहे. तसेच यातील काही कीटकनाशके तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरणे सक्‍तीचे करावे, असा प्रस्ताव कृषी विभागाने केंद्र सरकारकडे पाठविला आहे.  यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधा दुर्घटनेनंतर राज्य सरकारने कीटकनाशकांच्या वापराच्या व्यवस्थापनाबाबत काही नियमन असण्याची आवश्‍यकता केंद्राकडे व्यक्‍त केली आहे. यामध्ये कीटकनाशकांसाठी ‘कलर कोडिंग’ करताना लाल, पिवळा आणि निळा रंग वापरला जावा. ज्यामध्ये लाल आणि पिवळा कोडिंग असलेल्या कीटकनाशकांचा नोंदणीकृत कीटकनाशकांमध्ये समावेश केला जावा. लाल रंग हा अतिशय तीव्र कीटकनाशकासाठी, पिवळा लालच्या तुलनेत सौम्य पण या कीटकनाशकांचा समावेश परिशिष्ठात केला जावा. निळे कोडिंग वापरलेले कीटकनाशक अतिशय सौम्य असावीत आणि त्यांचा परिशिष्ठात समावेश नसावा, असेही कृषी विभागाने पाठविलेल्या या पत्रात स्पष्ट केले आहे. शेतमजूरांकडून धोकादायक कीटकनाशके थेट वापरण्यास बंदी घालण्याचाही विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com