agriculture news in Marathi, Need for public awareness as water is valued: Dr. Mallinath Kalshetty | Agrowon

पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. पाणी हे जीवन असून, ते अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरावे’’, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या जलजागृती सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. पाणी हे जीवन असून, ते अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरावे’’, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या जलजागृती सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग व कोल्हापूर महापालिकेच्या वतीने १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह झाला. सप्ताहाचा समारोप आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन आयुक्त डॉ. कलशेट्टी व कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आर. एम. संकपाळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील नदीमधील संकलित केलेले कलशाचे जल पूजन व दीपप्रज्वलनाने आले. 

प्रास्ताविकात संकपाळ म्हणाले, ‘‘शासनाच्या निर्देशानुसार २०१६ वर्षापासून जलजागृती दिन साजरा केला जातो. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये ६० गावे व १२ तालुक्‍यांच्या ठिकाणी जलजागृती सप्ताह साजरा केला आहे. आज या कार्यक्रमाचा सांगता समारंभ आहे.’’ 

जलसंपदा विभागाने व कोल्हापूर महापालिकेने एकत्र मिळून कामे हाती घेतल्यास शहराचा विकास होईल, असे सांगितले. यानंतर सर्वांनी उभे राहून जलप्रतिज्ञा घेतली.  

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, ‘‘जल दिनाचे औचित्य साधून समाजात जल साक्षरता करण्याची गरज आहे. प्रत्येकाने पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ न देता पाण्यासाठी काटकसरीने नियोजन करावे.’’

कारभारवाडीचे ठिबक सिंचन योजना पुरस्कर्ते प्रा. नेताजी पाटील म्हणाले, ‘‘कारभारवाडीत पाणी मुबलक असताना स्कीम बंद पडत आली होती. ग्रामस्थांच्या सांगण्यावरून १३१ शेतकऱ्यांना सोबत घेऊन ही स्कीम करणे सोपं नव्हतं. तरीही मार्च २०१५ मध्ये संपूर्ण गाव ठिबक सिंचन केले. सध्या उसाचे सरासरी उत्पादन हे ४३ टन आहे. यापूर्वी २७ टन सरासरी ऊस उत्पादन शेतकरी घेत होते. मात्र, सर्व शेती ठिबक सिंचनाखाली आणल्याने सरासरी उत्पादनात १६ टनांची वाढ होऊन ४३ टन उसाचे उत्पादन शेतकरी घेऊ लागलेत.’’ 

या वेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, डॉ. दिलीप पाटील, शंकर यादव, नगरसचिव दिवाकर कारंडे, डॉ. विजय पाटील, उदय गायकवाड उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ४५००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पाणीटंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील ३६...पुणे   : उन्हाच्या झळा वाढत असल्याने...
जनावरांच्या छावणीत बांधली गेली ‘...नगर : दुष्काळ पाचवीलाच पूजलेला, पिण्याचे पाणी...
शिरुर तालुक्यात रानडुकरांकडून उभ्या...रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्‍...
पाथर्डी, पारनेरमध्ये सर्वाधिक टॅंकरने...नगर : जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर परिणाम...
राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही...नगर  : मुस्लिम समाजाला भीती दाखविण्यासाठी...
सातारा जिल्ह्यात ३३६५ हेक्टरवर उन्हाळी...सातारा  ः जिल्ह्यातील पूर्व भागात तीव्र...
पाणीपुरवठ्यासाठी खानदेशात ५०७ विहिरी...जळगाव : पाणीटंचाई दूर करण्यासाठी खानदेशात सुमारे...
स्ट्रॉबेरी उत्पादनवाढीवर शेतकऱ्यांनी भर...भिलार, जि. सातारा  : स्ट्रॉबेरी महोत्सव हा...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...मुंबई   ः राज्यात लोकसभा निवडणुकीच्या...
अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी; तर...जालना ः  पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल...
मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न सोडविणार :...पैठण, जि. औरंगाबाद   : पश्चिम घाटातून...
मोदीजी, महाराष्ट्र तुम्हाला धडा...मुंबई : आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील...
दुष्काळाच्या हद्दपारीसाठी परदेशातूनही...गोंदवले, जि. सातारा : दुष्काळ हद्दपार करण्यासाठी...
अकोला, वाशीम जिल्ह्यांत तूर, हरभरा...अकोला  : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने...
बांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...